जगातील एकमेव सिंह जो डरकाळी विसरला; जंगलाच्या राजासोबत नेमकं काय झालं..?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:49 PM2023-01-24T18:49:57+5:302023-01-24T18:51:10+5:30

Ruben Lion : या सिंहासोबत अशी घटना घडली, ज्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तो एका लहान पिंजऱ्यात कैद आहे.

Ruben Lion : Ruben, The only lion in the world who forgot his voice; What exactly happened with the king of the jungle..? | जगातील एकमेव सिंह जो डरकाळी विसरला; जंगलाच्या राजासोबत नेमकं काय झालं..?

जगातील एकमेव सिंह जो डरकाळी विसरला; जंगलाच्या राजासोबत नेमकं काय झालं..?

googlenewsNext


Loneliest Lion Loses Roar : सिंह जंगलाचा राजा आहे. सिंहाची डरकाळी ऐकून भलेभले धाबरुन जातात. पण कल्पना करा की सिंह आपली डरकाळीच विसरला तर..? ऐकून आश्चर्य वाटेल, पण एक सिंह आपली डरकाळी विसरल्याचे प्रकरण समोर आले आहे. डरकाळीसह इतर अनेक गोष्टी तो विसरला आहे. त्या सिंहाची तब्येतही खालावली असून, सध्या त्याला नवजीवन देण्यात येत आहे.

पाच वर्षांपासून पिंजऱ्यात कैद
या सिंहाचे नाव 'रुबेन' असून हा जगातील सर्वात एकाकी सिंह आहे. हा सिंह डरकाळी विसरला आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, रुबेन आर्मेनियन-अजरबैजान सीमेवर बनवलेल्या प्राणीसंग्रहालयात होता. या प्राणीसंग्रहालयात राहणारा हा एकमेव प्राणी होता, ज्याला मालकाच्या मृत्यूनंतर पिंजऱ्यात कैद करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांपासून हा एका छोट्या पिंजऱ्यात होता. इतर सिंहांपासून वेगळं ठेवल्यामुळे तो अनेक गोष्टी विसराल होता.

रुबेन कर्कशपणे रडायचा
डरकाळी कशी फोडायची हे तो विसरला होता, त्यामुळे तो कर्कश आवाजात रडायचा. जान क्रेमर नावाच्या वन्यजीव अभयारण्य अधिकाऱ्याने सांगितले की, प्राणीसंग्रहालयातील इतर सर्व प्राण्यांना मालकाच्या मृत्यूनंतर वाचवण्यात आले, परंतु रुबेनसाठी जागा नव्हती. सिंह मोठ्या गटात राहतात आणि डरकाळीतून एकमेकांशी बोलतात, पण रुबेन एकटा असल्यामुळे तो सर्वकाही विसरला होता.

रुबेनला न्यूरोलॉजिकल समस्या 
असे सांगण्यात येत आहे की रुबेनला लवकरात लवकर दक्षिण आफ्रिकेत नेले जाईल, जिथे त्याच्यावर उपचार केले जातील. रुबेनला न्यूरोलॉजिकल समस्या आहे. तसेच, त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. जेव्हा तो चालतो तेव्हा तो डळमळतो आणि कधीकधी त्याचे पाय वळतात. त्याच्यावर लवकरच उपचार केले जाणार आहेत.

Web Title: Ruben Lion : Ruben, The only lion in the world who forgot his voice; What exactly happened with the king of the jungle..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.