रेल्वे चालवणाऱ्याला लोको-पायलट असंच का म्हटलं जातं? पाहा ड्रायव्हरला कसं मिळालं हे नवं नाव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:25 IST2026-05-19T13:24:25+5:302026-05-19T13:25:13+5:30
Railway Interesting Facts : रेल्वे चालवणाऱ्याला लोको-पायलट म्हटलं जातं? पण त्याला लोको-पायलट असंच का म्हटलं जातं? हा प्रश्न तर आपल्याला कधीना कधी पडला असेल, आता त्याचं उत्तर जाणून घेऊया.

रेल्वे चालवणाऱ्याला लोको-पायलट असंच का म्हटलं जातं? पाहा ड्रायव्हरला कसं मिळालं हे नवं नाव...
Railway Interesting Facts : भारतात रेल्वेने प्रवास केला नाही असं कुणी क्वचितच सापडेल. रोज लाखो लोक प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. म्हणूनच रेल्वे विभागाकडून रोज १३ हजारांपेक्षा जास्त रेल्वे देशभरात चालवल्या जातात. आरामदायक आणि स्वस्त प्रवासामुळे रेल्वे लोकांसाठी प्रवासाचं फेव्हरेट साधन बनली आहे. बरं लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात, पण त्यांना रेल्वेबाबतच्या कितीतरी गोष्टी माहीत नसतात. काही लोकांना रेल्वेसंबंधी कोड्स, नावं माहीत असतात पण त्यांचा अर्थ माहीत नसतो. अशाच एका गोष्टीबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आपल्याला कदाचित माहीत असेल की, रेल्वे चालवणाऱ्याला लोको-पायलट म्हटलं जातं? पण त्याला लोको-पायलट असंच का म्हटलं जातं? हा प्रश्न तर आपल्याला कधीना कधी पडला असेल, आता त्याचं उत्तर जाणून घेऊया.
लोको-पायलट असं का म्हटलं जातं?
आपल्याला माहीत असेलच की, सामान्यपणे सगळ्याच वाहन चालकांना ड्रायव्हर म्हटलं जातं. मग रेल्वे चालवणाऱ्याला ड्रायव्हर का म्हटलं जात नाही आणि त्यांना वेगळं नाव का दिलं गेलं. तर रेल्वे चालवणाऱ्याला लोको-पायलट म्हणण्याचं कारण फार सोपं आहे. रेल्वे चालवण्यासाठी 'लोकोमोटिव' इंजिन लावलं जातं आणि यातूनच 'लोको' हा शब्द आला. तेच पायलट हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो जड मशीन सुरक्षित पद्धतीने नियंत्रित करतो आणि पुढे नेतो. या दोन्हीना मिळून बनला लोको-पायलट हा शब्द. लोकोमोटिव इंजिन कंट्रोल करणारी व्यक्ती म्हणजे लोको-पायलट.
कोच काय असतो?
रेल्वेचा कोच असा डबा असतो ज्यात आपण आणि इतर लोक प्रवास करतात. एकाच रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोच असतात. जास्तीत जास्त रेल्वेत जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोच बघायला मिळतात. एसी कोचही तीन प्रकारचे असतात, ज्यात 1st, 2nd, 3rd AC असा फरक असतो. त्याशिवाय एसी चेअर कोचही रेल्वेत असतो.
बोगी म्हणजे काय?
बऱ्याच लोकांना हेच वाटतं की, कोच म्हणजेच बोगी. कोच आणि बोगी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित आपल्याला कल्पना नसेल, पण रेल्वेच्या डब्याखाली चाकांसह जे स्ट्रक्चर असतं, त्याला बोगी म्हणतात. बोगीवरच रेल्वेचे कोच टिकून असतात आणि एक कोचमध्ये २ बोगी लावलेल्या असतात. एका बोगीमध्ये ४ किंवा मग ६ चाकं लावलेली असतात. बोगीमध्ये ब्रेक डिस्क आणि सस्पेंशनसारख्या गोष्टी लागलेल्या असतात. तेच कोच रेल्वेच्या डब्याला म्हटलं जातं. ज्यात दोन भाग असतात एक म्हणजे कंपार्टमेंट आणि दूसरा लॉन. कम्पार्टमेंट ८ सीट्सच्या एका भागाला म्हटलं जातं. तर मधला जो भाग असतो तो कॉरिडोर असतो, त्याला लॉन म्हणतात.