काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:59 IST2026-01-05T18:57:54+5:302026-01-05T18:59:16+5:30
अमेरिकेत स्वतःची काळजी घेण्याला खूप महत्त्व दिले जाते. म्हणूनच आजकाल 'स्क्रॅच थेरपी' अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
अमेरिकेत जॉब करणं जगातील लाखो लोकांचं स्वप्न असते. अमेरिकेत नोकरी करून चांगली कमाई होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. टेक, हेल्थकेअर, फायनान्स, एज्युकेशनसारख्या विविध सेक्टर्समध्ये जॉब करण्यासाठी हजारो परदेशी कामगार अमेरिकेत पोहचतात. साधारणत: या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पगारही चांगला मिळतो. परंतु हळूहळू आता याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.
अमेरिकेत अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्या विचित्र मानल्या जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नोकऱ्या इतक्या जास्त पगाराच्या असतात की सर्वांनाच आश्चर्य वाटते. अशीच एक नोकरी आजकाल चर्चेचा विषय बनत आहे. आपण ज्या नोकरीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे पाठ खाजवण्याची नोकरी. आश्चर्यचकित होऊ नका कारण भारतात लोक हे काम त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून मोफत करून घेतात. तर अमेरिकेत पाठ खाजवण्याचं काम काम करणारे लोक प्रति तास ९००० रुपये कमवत आहेत. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही नोकरी प्रत्यक्षात अमेरिकेत अस्तित्वात आहे.
'स्क्रॅच थेरपी' लोकप्रिय
अमेरिकेत स्वतःची काळजी घेण्याला खूप महत्त्व दिले जाते. म्हणूनच आजकाल 'स्क्रॅच थेरपी' अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. न्यू यॉर्क सिटीसारख्या शहरांमध्ये, बरेच लोक स्क्रॅचिंग सेशन देत आहेत. काही स्पामध्ये आहेत तर काहींनी त्यांचे अपार्टमेंट 'थेरपी होम'मध्ये बदलले आहेत, जिथे तुम्हाला १०० डॉलर (अंदाजे ९००० रुपये) मध्ये एक तास 'स्क्रॅच थेरपी' मिळू शकते. ज्याप्रमाणे लोक मसाजसाठी अपॉइंटमेंट घेतात, त्याचप्रमाणे ते 'स्क्रॅच थेरपी'साठी देखील बुकिंग करत आहेत.
'स्क्रॅच थेरपी'ची ऑनलाइन शिकवणी
अमेरिकेत व्यावसायिक बॅक स्क्रॅचर्स विविध स्टुडिओमध्ये काम करत आहेत. ते प्रति तास १६२ डॉलर पर्यंत शुल्क आकारतात. विशेष म्हणजे स्क्रॅच थेरपी शिकण्यास इच्छुक असलेले कोणीही ऑनलाइन वर्ग घेऊ शकतात, ज्याची किंमत सुमारे २०,०००-२१,००० रुपये आहे. स्क्रॅच थेरपी वेळी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. बॅक स्क्रॅचर्स त्यांची नखे स्वच्छ ठेवतात आणि त्यांच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतात.
दरम्यान, कधीकधी स्क्रॅच थेरपीमध्ये तणाव कमी करण्यासाठी लोकांचे संपूर्ण शरीर खाजवणे समाविष्ट असते. प्रत्येक सत्र ३० ते ९० मिनिटांपर्यंत चालते. त्यात हातांना ट्रेस करणे, टाळू खाजवणे आणि हात किंवा विशेष उपकरणांचा वापर करून लयबद्ध स्ट्रोक करणे यासारख्या तंत्रांचा समावेश असतो. स्क्रॅच थेरपीमध्ये फक्त खाजवणे समाविष्ट नाही. सत्रांमध्ये हळू, नियंत्रित पद्धतीने खाजवणे समाविष्ट आहे आणि ते मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी आहेत.