पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:26 PM2019-12-18T12:26:58+5:302019-12-18T12:27:37+5:30

बालपणी आपण सगळ्यांनी झाडांची पाने तोडताना हे ऐकलं असेल की, रात्री झाडांची पाने तोडू नका, झाड झोपलेलं असतं...झाडांना पण वेदना होता...

Plants scream when they are in stress according to new research | पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा....

पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा....

googlenewsNext

बालपणी आपण सगळ्यांनी झाडांची पाने तोडताना हे ऐकलं असेल की, रात्री झाडांची पाने तोडू नका, झाड झोपलेलं असतं...झाडांना पण वेदना होता...नंतर हा विचार विकसित होत गेला. पण याचा पुरावा काही कधी समोर आला नाही. मात्र, आता सापडला आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर झाडांची पाने तोडली गेली तर ते सुद्धा ओरडतात.

काय सांगतो रिसर्च?

टेल अवीव युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला असून त्यांनी टोमॅटो आणि तंबाखूच्या झाडांवर हा रिसर्च केला. त्यांच्यानुसार, पर्यावरण किंवा बाहेरील दबावामुळे झाडे जोरात आवाज करतात. हे चेक करण्यासाठी त्यांना मायक्रोफोन्स ठेवले होते. तेही १० मीटर लांबीवर. नंतर झाडांच्या हालचाली रेकॉर्ड करण्यात आल्यात. यातून समोर आलं की, ज्या झाडांवर दबाव पडतो, म्हणजे जी झाडे ओढली जातात किंवा त्यांची पाने तोडली जातात ती झाडे २० ते १०० किलोहर्टज अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी उत्सर्जन करतात.

इतकेच नाही तर जेव्हा झाडांची पाने तोडली जातात तेव्हा ती झाडे इतर झाडांनाही त्यांच्या वेदना सांगण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासकांनी ३५ छोट्या छोट्या मशीन लावल्या ज्यांच्या द्वारे झाडांवर नजर ठेवली गेली. त्यांच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं.

जेव्हा टोमॅटो आणि तंबाखूच्या झाडांना अनेक दिवस पाण्यापासून दूर ठेवण्यात आलं तेव्हा त्यांनी ३५ अल्ट्रासॉनिक डिस्ट्रेस साउंड क्रिएट केला. म्हणजे झाडांना पाणी दिलं नाही तर त्यांना तणाव येतो. भलेही मनुष्यांना झाडांचा आवाज ऐकू येत नाही, पण वातावरण बदलामुळे झाडे कधीपासून ओरडत आहेत.


Web Title: Plants scream when they are in stress according to new research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.