पाचव्या मजल्यावर पेट्रोलपंप, कोणी जाईल का? चीनमध्ये आहे असे विचित्र शहर की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 16:06 IST2024-02-23T16:05:04+5:302024-02-23T16:06:11+5:30
तुम्ही म्हणाल फुकट मिळत असेल तर लोक जातील, परंतु विकत मिळत असेल तर कोणी जाईल का? तिथे जावे लागते.

पाचव्या मजल्यावर पेट्रोलपंप, कोणी जाईल का? चीनमध्ये आहे असे विचित्र शहर की...
चीनने अख्खी पॅरिसची कॉपी असलेले शहर बनविले आहे. आतातर चित्रविचित्र शहरातील गोष्टी बाहेर आल्या आहेत. या शहरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप खोलण्यात आला आहे. तुम्ही म्हणाल फुकट मिळत असेल तर लोक जातील, परंतु विकत मिळत असेल तर कोणी जाईल का? तिथे जावे लागते. कारण जमिनीवर या भागात कुठेही पेट्रोलपंप उभारण्यात आलेला नाहीय.
या शहराचे नाव चोंगकिंग आहे. या शहरात अशाच चित्रविचित्र गोष्टी पहायला मिळतात. या शहराचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. युझोंगमधील निवासी इमारतीच्या आतून मोनोरेलचा ट्रॅक आहे.
चीनने लोकांचा विश्वास बसणार नाही अशा गोष्टी बनविल्या आहेत. असेच हे शहर जे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते ज्याला माऊंटेन सिटी म्हणूनही ओळखले जाते. हे शहर उंचउंच निमुळत्या पर्वत रांगांवर वसलेले आहे. या इमारतींची उंची इतर इमारतींच्या हिशेबाने तिसऱ्या मजल्यापासून सुरु होते. डोंगर कापून हे शहर वसविण्यात आले आहे. असे असले तरी या शहरात सर्व सुविधा आहेत.
पाचव्या मजल्यावर जो पेट्रोल पंप आहे त्याच्या उंचीला समांतर इमारतीच्या बाजुने रस्ता जात आहे. यामुळे या रस्त्याला लागून पूल बांधण्यात आला असून त्याद्वारे लोक आपली वाहने घेऊन पेट्रोल पंपावर जातात. या अनोख्या शहरात तुम्ही पाण्यावर तरंगणाऱ्या इमारतीदेखील पाहू शकता. वाकडे तिकडे रस्तेही पाहू शकता. या गोष्टी एवढ्या विचित्र आहेत की त्या पाहून थक्क व्हायला होते.