जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:04 IST2026-02-23T13:04:02+5:302026-02-23T13:04:59+5:30

Amazing Facts : जगात एक देश असाही आहे जिथे विमानांचा रंग काळा असतो. चला तर पाहुयात कोणत्या देशात काळ्या रंगाचे विमान उडतात.

Only country in the world that has black planes, Know the reason | जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण...

जगातील एकुलता एक देश जिथे आहेत काळ्या रंगांची विमानं, पण काळा रंग का वापरला जातो? पाहा कारण...

Amazing Facts : भरपूर लोक आता एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्यासाठी विमानाच्या प्रवासाचा पर्याय निवडतात. विमानाने दूरचा प्रवास कमी वेळात पार केला जातो. आपण विमानांच्या रंगांकडे कधी लक्ष दिलं असेल तर दिसतं की, देश - विदेशातील जास्तीत जास्त विमानांचा रंग पांढरा असतो. पण जगात एक देश असाही आहे जिथे विमानांचा रंग काळा असतो. चला तर पाहूयात कोणत्या देशात काळ्या रंगाचे विमान उडतात. त्याआधी आपण हे जाणून घेऊया की, जास्तीत जास्त विमानांचा रंग पांढरा का असतो.

विमानांचा रंग पांढरा का असतो?

मान वर करून आकाशात उडणारं विमान बघण्यात एक वेगळीच गंमत असते. सामान्यपणे जेव्हाही आपण विमान बघतो, तेव्हा त्यांचा रंग पांढराच दिसतो. काही विमानांचा रंग वेगळाही असतो. पण जास्तीत जास्त विमान हे पांढऱ्या रंगांचेच असतात. त्याची काही कारणे आहेत. पांढरा रंग सूर्यकिरण सर्वाधिक प्रमाणात परावर्तित करतो, त्यामुळे विमान जास्त तापत नाही. इतर रंगांच्या तुलनेत पांढरा रंग कमी उडतो, त्यामुळे देखरेख आणि दुरुस्ती सोपी होते. नवीन पेंट केल्याने विमानाचं अतिरिक्त वजन वाढते; संपूर्ण विमान रंगवल्यास वजन सुमारे ५५० किलोपर्यंत वाढू शकतं, म्हणून कमी रंग वापरणे फायदेशीर ठरतं. तसेच पांढरा रंग पक्ष्यांना अधिक स्पष्ट दिसतो, त्यामुळे पक्षी विमानावर आदळण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो.

कोणत्या देशात उडतात काळ्या रंगाचे विमान?

फेसबुकवर @FlightDrama नावाच्या हँडलवर एका पोस्टमध्ये याचं उत्तर न्यूझीलँड देण्यात आलं आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एअर न्यूझीलँडचे काळे विमान दिसायला तर आकर्षक आहेतच, सोबतच राष्ट्रीय गौरवाचं प्रतीक देखील आहेत. सिल्व्हर फर्नने सजलेले हे काळे विमान न्यूझीलँडच्या सांस्कृतिक ओळख दर्शवतात.

२०१३ मध्ये पहिल्यांदा हे काळे विमान उडवायला सुरूवात झाली. हा काळा रंग पांढऱ्या रंगाच्या तुलनेत आश्चर्यकारकपणे हलका आहे. पण प्रायमरच्या जास्तीच्या थरांमुळे हा अधिक महाग आहे. पण तरीही तो आकर्षक दिसत असल्याने लोकांना आवडतो. आज एअर न्यूझीलँड एकमेव अशी एअरलाईन्स आहे जी पांढऱ्या आणि काळ्या अशा दोन्ही रंगांचे विमान चालवते.

याशिवाय, इंस्टाग्रामवर @theindianweekende या हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “Air New Zealand पासून ही एअरलाईन राष्ट्रीय अभिमान आणि प्रतिष्ठित All Blacks रग्बी संघापासून प्रेरणा घेऊन काळ्या रंगाची विमाने उडवत आहे. तसेच जगातील सर्वात मोठे काळ्या रंगाचे व्यावसायिक विमानही ही एअरलाईन चालवते.”


त्यामुळे यापुढे जर आपल्याला आकाशात कधी काळ्या रंगाचं विमान उडताना दिसलं तर समजून घ्या की ती कोणत्या देशाचं विमान आहे. 

Web Title : न्‍यूजीलैंड: काले विमानों वाला एकमात्र देश, जानिए क्यों है खास।

Web Summary : अधिकतर विमान धूप को परावर्तित करने और रखरखाव को आसान बनाने के लिए सफेद होते हैं। लेकिन, एयर न्यूजीलैंड काले विमानों का उपयोग करता है, जो राष्ट्रीय गौरव का प्रतीक है। यह ऑल ब्लैक्स रग्बी टीम से प्रेरित है और उनकी सांस्कृतिक पहचान का प्रतिनिधित्व करता है। काला रंग हल्का है, लेकिन महंगा है।

Web Title : New Zealand: The only country with black planes; here's why.

Web Summary : Most planes are white to reflect sunlight and ease maintenance. However, Air New Zealand uses black planes, a symbol of national pride, inspired by the All Blacks rugby team, representing their cultural identity. The black paint is surprisingly light, but more expensive due to extra primer layers.