बोंबला! लग्नाच्या पहिल्याच रात्री नव्या नवरा-बायकोचं झालं भांडणं, कारण वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 14:25 IST2022-09-08T14:23:42+5:302022-09-08T14:25:23+5:30

Bride And Groom Fight On Honeymoon : नवरदेवासोबत नवरीने वाद घातल्याने त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर दोन्ही परिवारांना हा वाद मिटवण्यासाठी समोर यावं लागतं. पण तेव्हापासून नवरी तिच्या माहेरी राहत आहे.

On honeymoon knight couple fight in Jaipur, reason will shocked you | बोंबला! लग्नाच्या पहिल्याच रात्री नव्या नवरा-बायकोचं झालं भांडणं, कारण वाचून चक्रावून जाल...

बोंबला! लग्नाच्या पहिल्याच रात्री नव्या नवरा-बायकोचं झालं भांडणं, कारण वाचून चक्रावून जाल...

Bride And Groom Fight On Honeymoon : राजस्थानची राजधानी जयपूरमधून नवविवाहित जोडप्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरी-नवरदेवाच्या मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाने नवरीला त्याच्या गर्लफ्रेन्डचा फोटो दाखवला. ज्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. नवरदेवासोबत नवरीने वाद घातल्याने त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर दोन्ही परिवारांना हा वाद मिटवण्यासाठी समोर यावं लागतं. पण तेव्हापासून नवरी तिच्या माहेरी राहत आहे.

या घटनेबाबतची माहिती तरूणीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली. 26 वर्षीय या तरूणीनुसार, तिचं लग्न 3 वर्षांआधी झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत तिने अनेक स्वप्ने रंगवली होती. पण मधुचंद्राच्या रात्री जे झालं, ते ती आयुष्यातही विसरू शकणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, नवरीला तिच्या पतीने असं काही दाखवलं जी बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तरूणीने सांगितलं की, पहिल्या रात्री तिच्या पतीने तिला त्याच्या गर्लफ्रेन्डचा फोटो दाखवला. इतकंच नाही तर तो म्हणाला की, भलेही त्याने तिच्यासोबत लग्न केलं आहे, पण पत्नी तो त्याच्या गर्लफ्रेन्डलाच मानतो. यावरून लग्नाच्या पहिल्या रात्री दोघांमध्ये भांडण झालं. मारहाणही करण्यात आली. नवरदेवाने नवरीला चांगलंच मारलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी-नवरदेवाच्या रूममध्ये जोरजोरात आवाज आल्याने घरातील लोक तिथे आले आणि दिराने कसंतरी त्यांचं भांडण थांबवलं.

दरम्यान, लग्न तर झालं होतं, पण पुढे जाऊन तरूणीच्या पतीचा व्यवहार बदलला नाही आणि तो तिला नेहमीच मारहाण करत होता. गर्लफ्रेन्डवरच्या प्रेमामुळे तो पत्नीसोबत वाईट वागत होता. त्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. काही दिवसांनी तिच्या दिराचं निधन झालं तेव्हा ती सासरी परत आली. त्यावेळी तिच्या पतीने पुन्हा तिच्यासोबत मारहाण केली. मग पुन्हा ती तिच्या माहेरी गेली. 

तरूणीने सांगितलं की, काही दिवसांनी ती तिच्या सासरी परत आली तेव्हा तिचा पती दारू पिऊन तिला मारहाण करत होता. यामुळे तिने एक दिवस पोलिसांना याची माहिती देऊन घरी बोलवलं. पोलिसांनी दोघांमधील वाद मिटवला. पण नंतर पुन्हा तरूणी तिच्या माहेरी निघून गेली.

Web Title: On honeymoon knight couple fight in Jaipur, reason will shocked you