शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

भारतीय शेतकऱ्यानं तयार केली अनोखी इलेक्ट्रीक कार; एलन मस्क देखील होतील हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 5:31 PM

कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय.

कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय. ओडिशामध्ये एका शेतकऱ्यानं चक्क सौरऊर्जेवर चार्ज होणारी इलेक्ट्रीक कार तयार केलीय. (odisha farmer electric vehicle that run 300km in a single charge)

तेलाच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्यानं सध्या इलेक्ट्रीक वाहनांचा जमाना आला आहे. अनेक वाहन निर्मात्या कंपन्या आता इलेक्ट्रीन वाहन उत्पादनाकडे वळत आहेत. पण भारतातील एक सामान्य शेतकरी कोणतंही इंजिनियरिंगचं शिक्षण न घेता इलेक्ट्रीक कार तयार करू शकतो यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. ओडिशामधील शेतकऱ्यानं तसं करुन दाखवलंय. 

ओडिशाच्या मयूरभंज येथील सुशील अग्रवाल नावाच्या शेतकऱ्यानं चारचाकी इलेक्ट्रीक वाहन तयार केलं आहे. विशेष म्हणजे ही कार सौरऊर्जेवर चार्ज होणारी आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ती तब्बल ३०० किमी इतकी चालवता येते. 

लॉकडाऊनमध्ये केली कमालसुशील अग्रवाल यांच्या घरीच एक वर्कशॉप आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे सगळं कामकाज ठप्प झालं होतं. अशावेळी फावल्या वेळेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार तयार करण्यावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारची बॅटरी साडेआठ तासांत पूर्णपणे चार्ज होते. स्लो चार्जिंग बॅटरी असल्यामुळे ती कमीतकमी १० वर्ष तरी चालेल, असा दावा सुशील यांनी केलाय. 

"लॉकडाऊन लागलं तेव्ही मी घरीच होतो. लॉकडाऊन हटल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होणार याची कल्पना मला होती. त्यामुळे इलेक्ट्रीक कार बनविण्याचा विचार केला. यात मी स्वत:ला व्यग्र देखील ठेवू शकलो. कार तयार करण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ आणि काही पुस्तकांनी मदत घेतली", असं सुशील अग्रवाल म्हणाले. 

"लॉकडाऊनचा सदुपयोग त्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार तयार करण्यासाठी केला याचा मला आनंद आहे. या वाहनामुळे प्रदुषण होणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. हेच वाहनांचं भविष्य आहे", असं मयूरभंज येथील आरटीओचे प्रमुख गोपाल कृष्ण दास यांनी सांगितलं.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारFarmerशेतकरीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन