डोळे बंद केल्यावर लाल किंवा काळा रंग दिसतो का? पण त्याचं नाव वेगळंच...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 11:05 AM2024-03-07T11:05:03+5:302024-03-07T11:05:25+5:30

तुम्हालाही अनेकदा या गोष्टीचा अनुभव आला असेल, पण असं का होतं हे माहीत नसेल.

Name of the color we see with close-eyes | डोळे बंद केल्यावर लाल किंवा काळा रंग दिसतो का? पण त्याचं नाव वेगळंच...

डोळे बंद केल्यावर लाल किंवा काळा रंग दिसतो का? पण त्याचं नाव वेगळंच...

तुम्ही अनेकदा लक्ष दिलं असेल की, डोळे बंद केल्यावर तुम्हाला एक वेगळाच रंग दिसतो. सामान्यपणे याला लोक काळा किंवा लाल मानतात. पण मुळात हा रंग वेगळाच असतो. जो प्रकाशासोबत जरा वेगळाच दिसतो. पण त्याला काय म्हणतात हे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ.

तुम्ही याबाबत कधी विचार केला असेल किंवा नाही. सामान्यपणे जेव्हा तुम्ही अंधाऱ्या जागेवर डोळे बंद करता तेव्हा काळा रंग दिसतो आणि प्रकाशाच्या ठिकाणी डोळे बंद केले तर लाल किंवा पिवळा रंग दिसतो. पण मुळात हा रंग तो नसतोच जो दिसतो. जो दिसतो तो फॉस्फीन आहे.

फॉस्फीन रंग स्वत:च एक ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे भ्रम असतो. हा आपल्या रेटिनामध्ये प्रकाशासोबत संवेदनशील कोशिकांना उत्तेजित करतो. जेव्हा आपण अंधारात असतो तेव्हा कोशिका कमी सक्रिय असतात आणि आपल्याला फॉस्फीन काळा दिसू लागतो.

तेच जास्त जास्त प्रकाशात डोळे बंद केले तर रेटिनातील कोशिका प्रकाशाने जास्त संवेदनशील होतात आणि आपल्याला फॉस्फीन जरा लाल किंवा पिवळा दिसतो. तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं असेल की, डोक्यावर जखम झाली तर अंधार दिसू लागतो. मुळात तो फॉस्फीन असतो.

आपण डोळ्यांसमोर अंधारी येणं, तारे चमकणं असं म्हणतो तो मुळात फॉस्फीन असतो. फॉस्फीन मायग्रेन किंवा डोकेदुखी वा चक्कर येण्यावर दिसतो.

महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या लोकांना फॉस्फीन वेगवेगळ्या प्रकारचा दिसू शकतो. काही लोकांना तो काळा दिसतो तर काही लोकांना रंगीत दिसू शकतो. सामान्यपणे याचा प्रभाव काही सेकंदाचा असतो. जर फॉस्फीन जास्त काळ दिसत असेल तर मग समस्या होऊ शकते.

Web Title: Name of the color we see with close-eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.