बापरे बाप! 'तुझी हिंमत कशी झाली मला चावण्याची?' असं म्हणत 'त्याने' चावून चावून मारला साप अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 15:30 IST2021-08-10T15:27:11+5:302021-08-10T15:30:24+5:30

Person said to snake how dare you bite me : एका 65 वर्षीय व्यक्तीच्या पायाला साप चावला. यानंतर रागाच्या भरात त्याने सापाला चावून चावून मारून टाकलं. 

nalanda person said to snake how dare you bite me and poisonous krait chewed raw know what happened | बापरे बाप! 'तुझी हिंमत कशी झाली मला चावण्याची?' असं म्हणत 'त्याने' चावून चावून मारला साप अन्... 

बापरे बाप! 'तुझी हिंमत कशी झाली मला चावण्याची?' असं म्हणत 'त्याने' चावून चावून मारला साप अन्... 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान बिहारमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. साप चावल्यानंतर संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क सापालाच (Poisonous Karait snake) चावून चावून मारून टाकल्याची घटना घडली आहे. 'तुझी हिंमत कशी झाली मला चावण्याची?' असं म्हणत त्या व्यक्तीने सापालाच मारलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये (Nalanda District of Bihar) ही घटना घडली आहे. माधोपूर डीह गावात राहणाऱ्या रामा महतो या 65 वर्षीय व्यक्तीच्या पायाला साप चावला. यानंतर रागाच्या भरात रामाने सापाला चावून चावून मारून टाकलं. 

सापाला चावल्याच्या काही वेळानंतर रामाचीही मृत्यू झाला. रामा महतो याला रात्रीच्या सुमारास एक साप चावला. नशेत असलेल्या महतोने सापाला पकडलं आणि त्याला चावून चावून मारून टाकलं. सापाला चावताना महतो त्याला म्हणत होता की तुझी हिंमत कशी झाली... तू मला चावलास? आता मी तुला चावणार. यानंतर सापाचा देखील मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रामा सापाला चावत होता तेव्हा साप देखील त्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी चावला होता. 

सापाला चावून झाल्यावर त्याला झाडावर लटकवून दिलं. त्यानंतर रामा झोपायला निघून गेला. यावेळी उपचार करण्याबाबत जेव्हा महतो याला सांगण्यात आलं तेव्हा त्याने नकार दिला. सापाचं पिल्लू असल्यामुळे विष चढणार नाही असं म्हणाला. रात्री रामा झोपला सकाळी जेव्हा तो हालचाल करत नसल्याचं दिसलं तेव्हा काही लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: nalanda person said to snake how dare you bite me and poisonous krait chewed raw know what happened