शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोचिंग क्लासमध्ये आत्या-भाच्याचं सूत जुळलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पळून जाऊन लग्न केलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:47 IST

आत्या आणि भाचा एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचे. त्याच वेळी या दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना घडली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. आत्या आणि भाचा एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचे. त्याच वेळी या दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या आत्या-भाच्याच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नामुळे कुटुंबासोबतच सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या जोडप्याचा पोलीस ठाण्यातच विवाह झाला. या लग्नामुळे मुलीच्या बाजूचे लोक चांगलेच संतापले आणि त्यांनी मुलीसोबतचं नातं तोडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमध्ये अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. औरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाच्याचा शेजारी राहणाऱ्या आत्यावर जीव जडला. दोघे कोचिंगमध्ये एकत्र शिकत असताना त्यांच्यात प्रेम झाले. प्रेम पडल्यावर दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. तर दुसरीकडे मुलीच्या वडिलांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर यादोघांनी अचानक औराई पोलीस ठाणे गाठून प्रेम आणि लग्न केल्याचं मान्य केलं आहे.

कपलने अचानक पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेतले. दोघेही प्रौढ असल्याने पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगितलं, मात्र मुलीकडचे ही गोष्ट मानायला तयार नव्हते. मुलीच्या वडिलांनी मुलीशी संबंध तोडून पोलीस स्टेशन सोडलं. यानंतर पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या उपस्थितीत आत्या-भाच्याचे विधिवत लग्न लावून देण्यात आलं. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सरिता कुमारी अखिलेशची नात्याने आत्या लागत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रेमात नात्याची पर्वा न करता दोघांनी लग्न केलं. 7 दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी अखिलेशवर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता, मात्र आता सरिताने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन लग्न केल्याचं मान्य केलं आहे. मुलीने सांगितले की ती प्रौढ आहे आणि तिच्या इच्छेने लग्न केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटके