मैत्रिणीच्या बाळाचं डायपर चेंज करत होती महिला, असं रहस्य उलगडलं की बसला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:41 IST2021-10-30T14:39:29+5:302021-10-30T14:41:29+5:30
प्रेग्नेन्सीनंतर मैत्रीणीची मदत करण्यासाठी गेलेल्या महिलेला एक दिवस समजलं की, तिच्या पाठीमागे तिच्या पतीचं आणि मैत्रिणीं अफेअर होतं.

मैत्रिणीच्या बाळाचं डायपर चेंज करत होती महिला, असं रहस्य उलगडलं की बसला धक्का...
मैत्रीचं नातं असतं ज्यात तुम्ही मन मोकळं करून त्यांच्यासोबत बोलू शकता. आता याच नात्यात जर दगा मिळाला तर व्यक्तीची काय अवस्था होईल? एका महिलेसोबत तिच्याच मैत्रीणीने असाच दगा दिला. प्रेग्नेन्सीनंतर मैत्रीणीची मदत करण्यासाठी गेलेल्या महिलेला एक दिवस समजलं की, तिच्या पाठीमागे तिच्या पतीचं आणि मैत्रिणीं अफेअर होतं. इतकंच नाही तर त्यांना एक बाळही आहे.
४ मुलांच्या आईसोबत ही घटना तेव्हा घडली जेव्हा ती मैत्रिणीच्या डिलेव्हरीनंतर तिची मदत करण्यासाठी तिच्या घरी काही दिवस थांबली होती. बाळाचं डायपर बदलत असताना महिलेला त्याच्या शरीरावर एक बर्थमार्क दिसला, अगदी तसा बर्थमार्क तिच्या पतीच्या आणि मुलाच्या शरीरावर आहे. हा बर्थमार्क पाहून महिला थोडावेळी कन्फ्यूज होती आणि मग तिने विचार केला.
बर्थमार्कने उघड झालं अफेअरचं रहस्य
Daily Star च्या रिपोर्टनुसार, महिलेने स्वत:च मैत्रिणीला सांगितलं होतं की, ती तिच्या मदतीसाठी थांबेल आणि प्रेग्नेन्सीमध्ये तिची मदत करेल. बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या शरीरावर तिला दोन तसेच बर्थमार्क दिसले, जसे तिच्या मुलाच्या शरीरावर होते. हे निशाण बाळाला आपल्या वडिलांकडून आनुवांशिक रूपाने मिळाले होते. अशात जेव्हा तिला बर्थमार्क दिसला, तर तिच्या लगेच लक्षात आलं की, तिच्या मैत्रिणी बाळ हे तिच्या पतीचंच आहे. मुलीच्या मानेवरही तसच निशाण होतं, जसा तिच्या मुलांच्या मानेवर होतं.
मैत्रिणीने मान्य केली चूक
TikTok Video च्या माध्यमातून महिलेने सांगितलं की, जेव्हा तिने हा बर्थमार्क पाहिला तेव्हा तिची मैत्रिणही बाजूला होती. आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि मी घराबाहेर निघून आली. नंतर महिलेच्या मैत्रिणीनेच हे मान्य केलं की, बाळ तिच्या पतीं आहे. महिलेच्या पतीने ६-७ महिन्यांनंतर हे मान्य केलं आणि दोघे वेगळे झाले. महिला म्हणाली की, तिने तिच्या मैत्रिणीसोबतच नातं ठीक केलं. कारण तिचं बाळ आणि माझी मुलं बहीण-भाऊ आहेत.