घरी येणाऱ्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली महिला, पती अन् सहा लेकरांना सोडून गेली पळून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:41 IST2025-01-07T16:40:56+5:302025-01-07T16:41:29+5:30

महिलेच्या पतीचा आरोप आहे की, पत्नी भिकाऱ्यासोबत फरार होण्यासोबतच घरातील पैसेही घेऊन गेली. पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

Mother of six children fell in love with beggar ran away from home with him | घरी येणाऱ्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली महिला, पती अन् सहा लेकरांना सोडून गेली पळून!

घरी येणाऱ्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली महिला, पती अन् सहा लेकरांना सोडून गेली पळून!

उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कथितपणे एक सहा मुलांची आई असलेली महिला एका भिकाऱ्यासोबत पळून गेली. महिला आपला पती आणि मुलांना सोडून पळून गेली. ज्या भिकाऱ्यासोबत ही महिला पळून गेली, तो तिच्या घरी भीक मागायला येत होता आणि हात बघून भविष्यही सांगत होता. दरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं. महिलेच्या पतीचा आरोप आहे की, पत्नी भिकाऱ्यासोबत फरार होण्यासोबतच घरातील पैसेही घेऊन गेली. पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.

हरदोई जिल्ह्याच्या हरपालपूरमधील ही घटना आहे. इथे ३६ वर्षीय महिला घरी भीक मागण्यासाठी येत असलेल्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळूनही गेली. महिला पळून गेल्यावर पोलिसात याबाबत तिच्या पतीनं तक्रार नोंदवली असून पत्नीला शोधण्याची विनंदी केली आहे.

पीडित पती राजूनं सांगितलं की, त्याला ६ मुलं आहेत आणि पत्नीला भिकारी पळवून घेऊन गेला. नन्हे पंडित नावाचा भिकारी नेहमीच त्याच्या घरी भीक मागण्यासाठी येत होता आणि हात बघून भविष्यही सांगत होता. पत्नी नेहमीच भिकाऱ्यासोबत बोलत होती. ३ जानेवारीला ती बाजारात भाजी आणायला गेला होती. परत आलीच नाही.

राजूनं सांगितलं की, पत्नी घरात ठेवलेले १ लाख ६० हजार रूपयेही सोबत घेऊन गेली. हे पैसे म्हैस आणि माती विकून त्यानं जमा केले होते. भिकारी तिला फूस लावून पळवून घेऊन गेला. त्याची नजर आधीपासूनच खराब होती.

तेच पोलिसांनी याबाबत सांगितलं की, राजू नावाच्या व्यक्तीनं भिकाऱ्या विरोधात पत्नीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाची गंभीरता बघता तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. तसेच दोघांचा शोधही सुरू केला आहे. 

Web Title: Mother of six children fell in love with beggar ran away from home with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.