शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

जगावेगळी ही माया! मेलेल्या बाळाला उराशी कवटाळून १० दिवसांपासून 'ती' माकडीण फिरतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 7:28 PM

माकडीणीनं १० दिवसांपूर्वीच तिचं पिल्लू गमावलंय; पण आईचं मन ते मानायला तयार नाही; शेवटी आईचं काळीज ते..

सतना: आईसारखं दैवत साऱ्या जगामध्ये नाही असं म्हणतात. कारण आईच्या माईची, तिच्या वात्सल्याची तुलना जगात कशासोबतही होऊ शकत नाही. लेकराच्या आनंदात आई आनंद शोधते. त्याला ती तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. लेकराला जरा काही झालं की लेकरापेक्षा जास्त वेदना त्याच्या आईला होतात. मग आईसमोरच लेकराचा प्राण गेला तर..? त्या माऊलीच्या दुखा:ची कल्पनाही करवत नाही. मध्य प्रदेशातल्या एका माकडीणीचं पिल्लू १० दिवसांपूर्वी हे जग सोडून गेलं. मात्र आईचं मन ते मानायला तयार नाही. गेल्या १० दिवसांपासून आई लेकराला घेऊन फिरतेय आणि या आईला पाहणाऱ्या प्रत्येकाच्या पापण्यांच्या कडा नकळत ओलावून जा आहेत.शाब्बास रे पठ्ठ्या! कारमधून २ वर्षांची मुलगी नदीत पडली, पठ्ठ्याने तिला वाचवण्यासाठी घेतली उडी!सतनामध्ये गेल्या १० दिवसांपासून एक माकडीण तोंडात काहीतरी घेऊन फिरत असल्याचं अनेकजण पाहत आहेत. सुरुवातीला काहींना ती तोंडात खाऊ घेऊन जात असल्याचं वाटलं. मात्र नीट पाहिल्यावर तिच्या तोंडात एक पिल्लू असल्याचं लक्षात आलं. एका दुर्घटनेत १० दिवसांपूर्वी माकडिणीनं तिचं पिल्लू गमावलं. मात्र शेवटी आईचं काळीज ते. आपलं लेकरू गेलंय यावर तिचा अजूनही विश्वास नाही. आपलं लेकरू झोपलंय, ते थोड्या वेळानं उठेल असा विचार करून ती त्याला आपल्यापासून जराही लांब होऊ देत नाही.बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....माकडीणीच्या पिल्लाचा मृत्यू १० दिवसांपूर्वी झाला आहे. त्यामुळे त्याचं मृत शरीर सुकलं आहे. मात्र त्याला हृदयाशी कवटाळून माकडीण फिरत आहे. ती जिथे जिथे जाते, तिथे तिथे त्याला सोबत नेते. आपलं लेकरू उठेल, ते चालू लागेल, उड्या मारू लागेल, अशी वेडी आशा आजही तिला आहे. आपल्या लेकराचा मृत्यू अद्यापही तिनं स्विकारलेला नाही. आपलं लेकरू या जगात नाही, याच्यावर तिचा अजूनही विश्वास नाही. एकीकडे माकडांची टोळी खाण्या पिण्यात व्यग्र आहे. तर दुसरीकडे माकडीण आपलं पिल्लू डोळे उघडेल याची वाट बघतेय. माकडीणीच्या चेहऱ्यावर तिच्या लेकराबद्दलचं प्रेम, माया, त्याच्याबद्दल वाटणारी चिंता अगदी स्पष्ट दिसतेय. हे दृष्ट अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारं आहे. या माकडीणीला पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे भरून येत आहेत. शेवटी आई ती आईच, याची प्रचिती या घटनेतून येतेय.