बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:40 PM2021-05-05T15:40:41+5:302021-05-05T15:44:24+5:30

Viral Photo : रस्त्यावर नियमांचे पालन न केल्यास पोलिस वेगवेगळ्या प्रकार शिक्षा करतात हे तर तुम्ही पाहिलंच असेल. सोशल मीडियावर आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. 

Viral Photo : This pic is going viral police guys are holding hands in front of his family | बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....

बाबो! एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला; चौकात पोलिसांनी अडवताच घडलं असं काही....

Next

कोरोनाच्या केसेस जसजशा वाढत आहेत. तसं देशभरातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. सरकार तसंच प्रशासनाकडून लोकांना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केलं जात आहे. मास्कशिवाय फिरत असलेल्या लोकांना पोलिसांकडून चांगलीच शिक्षा दिली जात आहे. रस्त्यावर नियमांचे पालन न केल्यास पोलिस वेगवेगळ्या प्रकार शिक्षा देतात हे तर तुम्ही पाहिलंच असेल. सोशल मीडियावर आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. 

कुटुंबातील ६ लोक एकाच एकाच बाईकवर बसून लग्नाला जात होते. आता तुम्ही म्हणाल दोन सीट्सच्या बाईकवर इतके लोक कसे काय बसतील? हा फोटो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'लग्नाला जायचं होतं म्हणून मास्क लावला आणि #Roadsefty ला ठेंगा'. असं गमतीदार कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.  बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब कर्फ्यूच्या काळात एका लग्नाला हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यावेळी  पोलिसांना त्यांना अडवलं. या सगळ्यांनी मास्क तर लावले होते. पण सोशल डिस्टेंसिंग आणि  वाहतुकीच्या नियमांना मात्र चांगलंच धाब्यावर बसवलं होतं. पोलिसांनी सुरूवातीला या लोकांना हात जोडले. त्यानंतर चालान कापून चालकाची समजूत काढून त्याला घरी पाठवण्यात आलं. 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ 

Read in English

Web Title: Viral Photo : This pic is going viral police guys are holding hands in front of his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.