आईचं मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत जुळलं सूत, म्हणाली - मी तुझ्या BF च्या बाळाची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 10:18 IST2022-09-29T10:11:48+5:302022-09-29T10:18:03+5:30

Relationship: अमेरिकेला राहणाऱ्या वेनेसाने सांगितलं की, ती सुट्टीत मेक्सिकोला गेली होती. त्यादरम्यान तिचा बॉयफ्रेंड आणि तिची आई दोघेही घरीच होते.

Mother had sex with daughter boyfriend he makes mom pregnant girlfriend shocked news | आईचं मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत जुळलं सूत, म्हणाली - मी तुझ्या BF च्या बाळाची...

आईचं मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत जुळलं सूत, म्हणाली - मी तुझ्या BF च्या बाळाची...

Cheating In Relationship: आई आणि मुलीचं नात जगात सगळ्या नात्यांमध्ये खास मानलं जातं. पण या तरूणीचा कहाणी ऐकून लोक तिच्या आईवर संताप व्यक्त करत आहेत. या तरूणीने तिची कहाणी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून सांगितली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरूणीने सांगितलं की, हा तिच्यासोबत झालेला सगळ्यात मोठा विश्वासघात आहे.

अमेरिकेला राहणाऱ्या वेनेसाने सांगितलं की, ती सुट्टीत मेक्सिकोला गेली होती. त्यादरम्यान तिचा बॉयफ्रेंड आणि तिची आई दोघेही घरीच होते. वेनेसा म्हणाली की, जेव्हा तिने मेक्सिकोहून आपल्या आईला फोन केला तेव्हा ती अचानक रडू लागली. काही दिवसांनी फोन कॉलवर तरूणीच्या आईने एक धक्कादायक खुलासा केला.

जेव्हा आईने मुलीला तिच्या प्रेग्नेंसीबाबत सांगितलं तर वेनेसा आनंदी झाली होती. कारण ती मोठी ताई होणार होती. पण तिचा हा आनंद काही वेळासाठीच टिकला. यानंतर तरूणीच्या आईने तिला सांगितलं की, ज्या बाळाला ती जन्म देणार आहे, ते तरूणीच्या बॉयफ्रेंडचंच आहे. वेनेसाला फार मोठा धक्का बसला. तरूणीने रागाच्या भरात लगेच आपली आई आणि बॉयफ्रेंडचा नंबर ब्लॉक केला. यानंतर ट्रिप सोडून तरूणी आपल्या देशात परत आली. पण तिने घरी न राहता दुसरीकडे राहण्याचं ठरवलं.

सोशल मीडियावर या तरूणीसोबत झालेल्या दग्याची कहाणी सांगणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकही तिची कहाणी ऐकून तिच्या आईवर संताप व्यक्त करत आहेत. इतकं सगळं होऊनही तरूणाने तरूणीला समजावण्याची हिंमत केली. पण तरूणीने त्याला आणि आपल्या आईला माफ केलं नाही.

Web Title: Mother had sex with daughter boyfriend he makes mom pregnant girlfriend shocked news