Model loses twelve kg drinking water : .....म्हणे १२ दिवसात फक्त पाणी पिऊन घटवलं १२ किलो वजन; ट्रोल करत नेटिझन्सनी दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 14:35 IST2021-04-16T14:26:43+5:302021-04-16T14:35:35+5:30
Model loses twelve kg drinking water : या मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम फक्त ३६ दिवसांचा होता. त्यातील १२ दिवस तिनं फक्त पाण्याचे सेवन केले. इतर वेळी भाज्या, फळं, शेक, सप्लिमेंट्स आणि भूक न लागण्याच्या गोळ्याचा आहारात समावेश केला.

Model loses twelve kg drinking water : .....म्हणे १२ दिवसात फक्त पाणी पिऊन घटवलं १२ किलो वजन; ट्रोल करत नेटिझन्सनी दिलं भन्नाट उत्तर
कमी वजन आणि फिटं राहणं कोणाला नको असतं. पण ते वाटतं तितकं सोपं अजिबात नाही. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. करिना कपूर खान काही दिवसापूर्वी आपल्य स्लिम फिगरमुळे खूप चर्चेत होती. आता चीनी सिनेमााची मॉडेल आपल्या वजन कमी करण्याच्या उपायामुळे तुफान चर्चेत आहे.
चीनमधील लोकप्रिय सोशल मीडियावर वेबासईटवर वायबो ज्होऊ वेटिंग नावाची मॉडेल आपल्या विवादीत डाएटमुळे पुन्हा चर्चेत आहे. या मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम फक्त ३६ दिवसांचा होता. त्यातील १२ दिवस तिनं फक्त पाण्याचे सेवन केले. इतर वेळी भाज्या, फळं, शेक, सप्लिमेंट्स आणि भूक न लागण्याच्या गोळ्याचा आहारात समावेश केला.
तिनी हे सुद्धा सांगितले की, या डाएटवर ती नेहमी राहणार नाही. तिचे पुढचे पाऊल व्यायाम आणि हेल्दी फूड्सच्या माध्यमातून आपलं वजन कमी करणं हे असणार आहे. गरमीच्या वातावरणात स्वतःला फिट ठेवण्यासाठी या प्रकारचे डाएट करणार आहे.
एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!
तिनं एका पोस्टमध्ये सुचना देत सांगितले की, लोकांनी आपल्या आरोग्याची स्थिती पाहता डाएट फॉलो करायला हवं. डॉक्टरांशी बोलून आपल्या शरीराचा विचार करून डाएट करायला हवं. ही पोस्ट लिहिल्यानंतर या मॉडेलवर टिकेचा भडीमार होत आहे.
फक्त पाणी पिण्याचे डाएट लोकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. असं अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे इंटींग डिसॉर्डर होण्याची शक्यता आहे. म्हणून अशा प्रकारचा डाएट लोकांशी शेअर करण्याआधी विचार करायला हवा होता. अशी प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे.