ड्रीम जॉब! जगभरात फिरायचंय आणि फोटो काढायचे, एका महिन्याचा पगार मिळेल २२ लाख रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 11:57 IST2019-12-19T11:54:28+5:302019-12-19T11:57:16+5:30

अनेकजण त्यांच्या ड्रीम जॉबचा शोध घेत असतात. पण प्रत्येकालाच ड्रीम जॉब मिळेलच असं नाही. पण आता तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आली आहे.

The millionaire hiring personal photographer with 28k salary | ड्रीम जॉब! जगभरात फिरायचंय आणि फोटो काढायचे, एका महिन्याचा पगार मिळेल २२ लाख रूपये!

ड्रीम जॉब! जगभरात फिरायचंय आणि फोटो काढायचे, एका महिन्याचा पगार मिळेल २२ लाख रूपये!

अनेकजण त्यांच्या ड्रीम जॉबचा शोध घेत असतात. पण प्रत्येकालाच ड्रीम जॉब मिळेलच असं नाही. पण आता तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आली आहे. जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्हाला जगभर फिरायचंय आणि फक्त फोटो क्लिक करायचे आहेत. आणि या कामासाठी तुम्हाला महिन्याला २२ लाख रूपये मिळणार...तर तुम्ही काय कराल? अर्थातच बहुतेक लोक लगेच होकार देतील. 

Matthew Lepre ऑस्ट्रेलियाचा राहणारा आहे. तो कोट्यधीश आहे. त्याला पर्सनल असिस्टंटची गरज आहे. ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला जगभरात फिरण्याची संधी तर मिळेलच सोबतच २८ हजार यूरो प्रति महिना पगार मिळेल. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम २२ लाख रूपये इतकी होते.

नेमकं काय करायचंय?

आता नेमकं काम काय करायचंय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर Lepre व्यवसायाने eCom Warrior Academy चा फाउंडर आहे. त्याने हा बिझनेस त्याच्या हिंमतीवर उभा केलाय. आता या नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या व्यक्तीला खूपसारे फोटो काढायचे आहेत. तसेच ते सोशल मीडियात पोस्ट करायचे आहेत.

कंपनीकडूनच केला जाईल खर्च

ज्या व्यक्तीला ही नोकरी मिळेल त्याचा ट्रॅव्हलचा खर्च कंपनीकडून केला जाईल. Lepre याने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून तो एकटाच बिझनेसवर फोकस करत आहे. त्याचे फोटो त्याचे मित्र काढतात. पण त्याला पर्सनल फोटोग्राफरचा शोध आहे. 


Web Title: The millionaire hiring personal photographer with 28k salary