This Mexican man traps himself in hole dug to spy on her ex girlfriend | ...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला!

...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला!

(Image Credit : www.wkyc.com)

गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेन्ड काहीना काही रिकामे उद्योग करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील. पण उत्तर मेक्सिकोमध्ये एका बॉयफ्रेन्डने याबाबत सर्व सीमा पार केल्या आहेत. त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या घरापर्यंत भुयारी मार्ग खोदला. पण झालं असं की, तोच त्यात अडकला आणि नंतर त्याला बचाव पथकाकडून वाचवण्यात आले. 

एबीसी न्यूजनुसार, Sonora State Attorney General कडून सांगण्यात आले की, एका ५० वर्षीय व्यक्तीने Puerto Penasco मध्ये त्याच्या गर्लफ्रेन्डच्या घराखाली एक भुयार खोदला आणि नंतर स्वत:च त्यात अडकला.  

स्थानिक वृत्तपत्र EI Univeral ला दिलेल्या मुलाखतीत महिलेने सांगितले की, सुरूवातीला तिला वाटलं की, तिने ऐकलेला आवाज हा मांजरीचा असावा. पण स्नॅचिंगचा आवाज दिवसेंदिवस वाढत होता आणि तोही घराच्या खालून. जेव्हा तिने याचा शोध घेतला तेव्हा तिला दिसले की, तिचा बॉयफ्रेन्ड तिथे अडकून पडला आहे. तिने सांगितले की, दोघांचं रिलेशन १४ वर्षांपासून होतं. नंतर दोघे वेगळे झाले होते.
पोलिसांनी आधीच या व्यक्तीला एक्स गर्लफ्रेन्डपासून दूर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.

महिलेने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे आणि त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्या व्यक्तीला बोगद्यातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्याची स्थिती फारच वाईट होती. त्याला डिहायड्रेशनची समस्या झोली होती. 

Web Title: This Mexican man traps himself in hole dug to spy on her ex girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.