पाकिस्तानी वैमानिकाचा UFO पाहिल्याचा दावा; लोकं म्हणाली, "भीक मागायचा कटोरा असेल"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:40 IST2021-01-28T18:36:04+5:302021-01-28T18:40:57+5:30

पाकिस्तानमधील एका वैमानिकानं UFO पाहिल्याचा दावा केला होता.

memes jokes viral on pakistan pia pilot claims he saw ufo social media trolled | पाकिस्तानी वैमानिकाचा UFO पाहिल्याचा दावा; लोकं म्हणाली, "भीक मागायचा कटोरा असेल"

पाकिस्तानी वैमानिकाचा UFO पाहिल्याचा दावा; लोकं म्हणाली, "भीक मागायचा कटोरा असेल"

ठळक मुद्देयुझर्सनं केलं ट्रोलपाकिस्तानच्या वैमानिकानं केला होता UFO पाहिल्याचा दावा

पाकिस्तानच्या एका पायलटनं उड्डाणादरम्यान एक युएफओ पाहिल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपनीच्या वैमानिकानं हा दावा केला होता. उड्डाणादरम्यान आपल्यालाला आकाशात एक चमकदार युएफओ दिसल्याचं त्यानं म्हटलं. लाहोरहून कराचीदरम्यानच्या उड्डाणात रहीम यार खान या वैमानिकाला युएफओ दिसल्याचं वृत्त जिओ न्यूजनं या वैमानिकाच्या हवाल्यानं दिलं होतं. या घटनेचा व्हिडीओदेखील आपण घेतला असल्याचा दावा त्या वैमानिकानं केला. हे वृत्त पसरताच सोशल मीडियावर मात्र त्याला आणि पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरूवात झाली.














 


 


एका यझुरनं तुम्हाला भीक मागण्यासाठी अॅल्युमिनिअमचा कटोरा दिसला असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तर काही जणांनी तुम्ही मजा उडवताय का असे मीम्स शेअर केले. तर एकानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो शेअर करत युएफओसोबत हेच तर नव्हते ना असा सवालही केला. 

Web Title: memes jokes viral on pakistan pia pilot claims he saw ufo social media trolled