शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

डोक्यावरचं छप्पर हरपलं! अर्धांगवायू असतानाही ६९ वर्षीय आजोबा करताहेत तलावाची साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:27 IST

या आजोबांना पॅरालिसिसचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना उभं राहायलाही त्रास होतो.

कितीही अडचणी येवोत आपल्या कर्तव्यावर हजर असणारे आणि तितकेच तत्पर असणारे लोक तुम्ही पाहिले असतील आज आम्ही तुम्हाला अशाच एका आजोबांबद्दल सांगणार आहोत. या आजोबांना पॅरालिसिसचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना उभं राहायलाही त्रास होतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.     ६९ वर्षांच्या या आजोबांचे नाव एन एस राजप्पन आहे. केरळच्या कोट्याकम जिल्ह्यातील हे आजोबा रहिवासी आहेत. 

इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एन एस राजप्पन हे गेल्या ६ वर्षांपासून नाल्यातून कचरा बाहेर काढण्याचे काम करत आहेत. त्यांच्या गुडघ्याच्या खालचा भाग पॅरेलाईज्ड आहे. त्यामुळे ते चालू शकत नाहीत. हाताला पकडून त्यांना त्यावं लागतं. अशाच अवस्थेत पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी रोज तलावातून कचरा काढतात. वेंबनाड आणि  कुमारकोम या तलावातील कचरा साफ करतात. 

अभिनेता रणबीर हुड्ड्डा याने  या आजोबांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पर्यावरणाला स्वच्छ ठेवत असलेल्या या आजोबांचा व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवला. देशाबद्दल आपलं प्रेम दाखवण्यासाठी हे आजोबा  तलावाची  साफसफाई करण्याचं काम अनेक वर्षांपासून  करत आहेत. लोकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसंच  देशभक्तीचा खरा चेहरा असं ही या आजोबांना म्हटलं आहे. 

द न्यूज मिनटने दिलेल्या माहितीनुसार राजप्पने हे तलाव साफ करण्यासाठी एक बोट भाड्याने घेतात. नंतर ती बोट चालवून तलावातील कचरा साफ करतात. त्यांनी सांगितले की,'' हे काम केल्यानंतर मला जास्त काही मिळत नाही. पूर्ण प्लास्टिकच्या बॉटल्सनी भरलेल्या बोटीत एक किलोपेक्षा कमी कचरा असतो. एक किलो प्लास्टिकसाठी मला १२ रुपये मिळतात.  पण कोणीतरी या कामातही पुढकार घ्यायला हवा.  मी माझ्या आयुष्यातील जास्तीत काळ हे काम करण्यात घालवला आहे.  आता मला हे काम करण्यासाठी मोठी बोट हवी आहे जेणेकरून मी मला जास्तीत जास्त परिसर कव्हर करता येईल. ''

या आजोबांकडे स्वतःचे घर सुद्धा नाही. बाजूला त्यांची बहिण राहते ती त्यांना जेवण  देते. दोनवर्षापूर्वी आलेल्या माहापूराने सारं काही उद्भवस्त केलं.  तरिही  हार न मानता पर्यावरण सेवेसाठी या आजोबांनी पुढाकार घेतला आहे. 

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलKeralaकेरळ