विकृतीचा कळस ! शेजारी राहणाऱ्या महिलेचे अंडरगारमेंट्स चोरी करत होता २५ वर्षी तरूण, कारण ऐकून पोलीसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:59 IST2026-03-14T11:51:18+5:302026-03-14T11:59:07+5:30
Viral News : आधीतर घरातील लोकांना वाटलं की, कुणीतरी गंमत करत असेल, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा प्रकरण फारच गंभीर असल्याचं समोर आलं.

विकृतीचा कळस ! शेजारी राहणाऱ्या महिलेचे अंडरगारमेंट्स चोरी करत होता २५ वर्षी तरूण, कारण ऐकून पोलीसही हैराण
Viral News : एकतर्फी प्रेमाच्या कितीतरी भयावह आणि विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. एकतर्फी प्रेमात लोक काय काय करतील याचा काही नेम नसतो. पण सध्या एकतर्फी प्रेमाच्या ज्या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती फारच वेगळी आणि विचित्र आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील ही घटना असून इथे एक तरूणाने विकृतीचा कळसच गाठला. आधीतर तक्रारदार परिवारातील लोकांना वाटलं की, कुणीतरी गंमत करत असेल, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा प्रकरण फारच गंभीर असल्याचं समोर आलं.
उज्जैनच्या ढाचा भवन परिसरात हा प्रकार घडला. येथील एका परिवाराला काही दिवसांपासून एका वेगळ्या समस्येचा सामना करावा लागत होता. घरातील महिला नेहमीप्रमाणे रोज कपडे घराबाहेरच्या दोरीवर वाळत घालत होती. पण दुसऱ्या दिवशी यातील काही कपडे गायब व्हायचे. बाकीचे कपडे तसेच रहायचे, पण महिलेचे अंडरगारमेंट्स गायब व्हायचे. आधी याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा पुन्हा पुन्हा असं होऊ लागलं तेव्हा घरातील लोकांचा संशय वाढला. अशात त्यांनी घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज चेक केलं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये परिवाराला दिसलं की, एक तरूण रात्री गुपचूप येतो, कुणी आजूबाजूला नाही याची खात्री करतो. त्यानंतर हळूच महिलेचे अंडरगारमेंट्स घेऊन तिथून निघून जातो. कुटुंबियांनी हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवलं.
पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली आणि हा तरूण त्याच परिसरात राहणारा असू शकतो, असा त्यांनी विचार केला. त्यांना एका तरूणावर संशय देखील आला. ज्याचं नाव होतं अंकित मालविय. २५ वर्षीय अंकितला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हैराण झाले.
चौकशीदरम्यान, त्याच परिसरात राहणाऱ्या या तरूणाने कबूल केलं की, तो एका विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करतो. तो बऱ्याच वर्षापासून या महिलेला पसंत करतो. याच आकर्षणाने त्याने हे विचित्र पाऊल उचललं. चौकशी करत असताना पोलिसांसमोर आणखी बाब आली की, आरोपी अंकितने आपल्या छातीवर महिलेच्या नावाचा टॅटूही काढला होता. हा आरोपी काही अनोळखी नव्हता. तो त्याच परिसरात राहणारा होता आणि तक्रार करणाऱ्या परिवाराचा तो शेजारी होता. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.