VIDEO : वाह रे पठ्ठ्या! ट्रेन चालवते त्याची गर्लफ्रेन्ड, म्हणून थेट स्टेशनला जाऊन असं केलं प्रपोज....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 09:41 AM2020-12-22T09:41:00+5:302020-12-22T09:42:12+5:30

पीअर्स स्टेशनवर एका महिला लोको पायलट(ट्रेन ड्रायव्हर)ला तिच्या बॉयफ्रेन्डने फारच खा अंदाजात प्रपोज केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Man proposes to his girlfriend in Dublin railway station in Ireland watch viral video | VIDEO : वाह रे पठ्ठ्या! ट्रेन चालवते त्याची गर्लफ्रेन्ड, म्हणून थेट स्टेशनला जाऊन असं केलं प्रपोज....

VIDEO : वाह रे पठ्ठ्या! ट्रेन चालवते त्याची गर्लफ्रेन्ड, म्हणून थेट स्टेशनला जाऊन असं केलं प्रपोज....

Next

काही प्रपोजल इतके शानदार असतात की, लोकांना हे व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायचे असतात. सध्या चर्चेचा विषय ठरत असलेला हा व्हिडीओ असाच आहे. हा व्हिडीओ आहे आयरलॅडची राजधानी डब्लिनचा. येथील पीअर्स स्टेशनवर एका महिला लोको पायलट(ट्रेन ड्रायव्हर)ला तिच्या बॉयफ्रेन्डने फारच खा अंदाजात प्रपोज केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर @Clodagh1990 ने १६ डिसेंबरला शेअर केला होता. याच्या कॅप्शनला त्याने लिहिलं होतं की, 'मला नाही वाटत की, १३ तासांच्या थकवणाऱ्या शिफ्टनंतर यापेक्षा शानदार काही होऊ शकत नाही. या व्यक्तीने त्याच्या प्रेयसीला पीअर्स स्टेशनवर प्रपोज केलं. ती एक ट्रेन ड्रायव्हर होती'.

यात तुम्ही बघू शकता की, एका ट्रेन पीअर्स स्टेशनवर येऊन थांबते. यातून एक महिला ड्रायव्हर खाली उतरते.  समोर तिचा बॉयफ्रेन्ड उभा आहे. ती जवळ येताच तो त्याच्या गुडघ्यावर होऊन तिला लग्नासाठी प्रपोज करतो. यावेळी त्याच्या हातात एक बुके आणि बाजूला बोर्डही लावला आहे. ज्यावर माझ्याशी लग्न करशील का? असं लिहिलंय. तर बॅकग्राउंडला गाणंही वाजत आहे.

या महिलेने लग्नासाठी होकार दिला आहे. पाउला कार्बो जिया असं या महिलेचं नाव असून तिने आयरिश टाइम्सला सांगितले की, कदाचित ख्रिसमससाठी मी असाच काही विचार करत होते. मात्र रेल्वे स्टेशनवर असं काही होईल याचा अजिबात विचार केला नव्हता.
 

Web Title: Man proposes to his girlfriend in Dublin railway station in Ireland watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.