शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

बोंबला! गुगल मॅपमुळे दुसऱ्याच नवरीसोबत लग्न करता करता राहिला नवरदेव....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 10:34 AM

इंडोनेशियातील एका नवरदेवासोबत एक विचित्र किस्सा घडला. 'जाना था जपान पोहोच गये चीन' असं काहीसं या घटनेला म्हणता येईल.

(Image Credit : wikipedia.org)(प्रातिनिधिक छायाचित्र)

टेक्नॉलॉजीमुळे लोकांचं जीवन सोपं झालंय, कामं सोपी झालीत हे खरंय. मात्र याचे अनेक फायदे असले तरी नुकसानही भरपूर आहेत. अनेकदा टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी विचित्रही घडतं. आता हेच बघा ना...इंडोनेशियातील (Indonesia) एका नवरदेवासोबत असाच एक विचित्र किस्सा घडला. 'जाना था जपान पोहोच गये चीन' असं काहीसं या घटनेला म्हणता येईल. झालं असं की, नवदेवाला ज्या लग्न घरी जायचं होतं तो तिथे न जाता दुसऱ्याच नवरीच्या लग्न मंडपात शिरला. आणि हा सगळा गोंधळ झाला तो गुगल मॅपमुळे (Google Map).

आश्चर्याची बाब म्हणजे या नवरदेवाची वरात चुकीच्या लग्न मंडपात शिरली. पण समोरच्या लोकांनी सुद्धा या पाहुण्यांचं चांगलं स्वागत केलं आणि फ्रेश होण्याची व्यवस्थाही केली. अशात दोन्ही परिवारातील लोक संवाद साधत असताना नशीबाने वेळेवर हा खुलासा झाला की, नवरदेव चुकीच्या लग्न घरी आला आहे. काही वेळातच चूक सर्वांच्या लक्षात आली आणि एकच हशा पिकला.

Tribun न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एकाच गावात दोन कार्यक्रम होते. एक लग्न सोहळा होता आणि एक साखरपुडा होता. बरं ह्या सर्व गोंधळाबाबत नवरीला काहीच कल्पना नव्हती. कारण ती आनंदी होती आणि मेकअप करण्यात बिझी होती. चुकीच्या लग्न मंडपात चुकीचा नवरदेव आल्याच्या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात आलेली वरात परत जाताना दिसत आहे. तर काही महिला हसतानाही दिसत आहेत.

Kompas ने दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेवाकडील लोक लग्न मंडपाचा शोध घेण्यासाठी गुगल मॅपच्या भरोशावर राहिले. त्यांना सेंट्रल जावाच्या लोसारी हॅमलेट गावात जायचं होतं. अशात लोसारी हॅमलेटऐवजी नवरदेवाची वरात जेंगकोल हॅमलेट गावात पोहोचले. दोन्ही गावे आजूबाजूला आहेत. ज्या लग्नात नवरदेव पोहोचला त्या नवरीचं नाव मारिया उल्फा असं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, उल्फाने सांगितले की, तिचा होणार पती आणि त्याच्या परीवारातील लोकांना येण्यास उशीर झाला. ते रस्त्यात टॉयलेटचा शोध घेत होते. यादरम्यानच दुसरा नवरदेव आणि त्याची वरात तिथे पोहोचली. ती म्हणाली की, 'मला ओळखत नसलेल्या माणसांचा ग्रुप पाहून मला धक्काच बसला. अशात तिच्या एका काकाच्या हा गोंधळ लक्षात आला आणि वेळीच मोठा अनर्थ टळला.

रिपोर्टनुसार, नवरदेव आणि त्याच्या परीवाराने नवरीकडील म्हणजे उल्फाकडील लोकांनी माफी मागितली. त्यांच्या मदतीनेच त्यांनी मूळ लग्न घर शोधलं. नंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोक तर असंही म्हणाले की, हे नवरदेवाच्याही लक्षात कसं आलं नाही की, तो चुकीच्या ठिकाणी पोहोचलाय.  

टॅग्स :Indonesiaइंडोनेशियाmarriageलग्नgoogleगुगलJara hatkeजरा हटके