पाळलेल्या बदकाच्या पोटात सापडलं सोनं, मालक मालामाल...पण त्याच्या पोटात सोनं आलं तरी कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:46 IST2026-03-12T13:45:41+5:302026-03-12T13:46:34+5:30

Gold in Duck Stomach : बदकाच्या मालकाचं नाव लियू आहे. त्याने जेव्हा आपलेलं पाळलेलं बदक कापलं तेव्हा अवाक् झाला.

Man finds gold worth lakhs inside duck's stomach in China, know the facts | पाळलेल्या बदकाच्या पोटात सापडलं सोनं, मालक मालामाल...पण त्याच्या पोटात सोनं आलं तरी कुठून?

पाळलेल्या बदकाच्या पोटात सापडलं सोनं, मालक मालामाल...पण त्याच्या पोटात सोनं आलं तरी कुठून?

Gold in Duck Stomach : सोनं सामान्यपणे वेगवेगळ्या खाणींमधून काढलं आणि नंतर ते शुद्ध करून विकलं जातं. बरेच लोक काही नद्यांमध्ये सुद्धा सोनं शोधत असतात. सोन्याचा एक एक कण गोळा करून ते विकून लोक पैसे कमावतात. पण चीनच्या लोंगहुआ काउंटीमधून सोन्याबाबत एक आश्चर्यकारक घटना समोर आलीये. इथे एका व्यक्तीने एक बदल पाळलं होतं. अचंबित करणारी बाब म्हणजे या बदकाच्या पोटात १.६ लाख रूपयांचं सोनं सापडलं. फेब्रुवारी महिन्यातील या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदकाच्या मालकाचं नाव लियू आहे. त्याने जेव्हा आपलं पाळलेलं बदक कापलं तेव्हा तो अवाक् झाला. कारण त्याला बदकाच्या पोटात सोन्याचे बरेच छोटे छोटे कण दिसले. आधी तर त्याच्या लक्षात आलं नाही की, हे काय आहे. पण नंतर जेव्हा त्याने हे कण जाळून चेक केले तर ते सोन्याचे तुकडे होते.

बदकाच्या पोटात सोनं आलं कुठून? 

मीडिया रिपोर्टनुसार बदकाच्या पोटातून निघालेल्या सोन्याचं वजन १० ग्रॅम होतं. ज्याची किंमत १२ हजार युआन आहे. भारतीय करन्सीत ही रक्कम १ लाख ६० हजार रूपये इतकी होते. लियूने शक्यता वर्तवली की, जेवण शोधत असताना बदकाने सोन्याचे कण गिळले असतील. बदक नदी किनारी असलेल्या चिखलात जेवण शोधत होतं. गावाजवळून चिशुई नदी वाहते आणि ही नदी सोनं सापडण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

लोकांचं मत आहे की, नदीतील मातीमध्ये सोन्याचे छोटे छोटे कण असू शकतात. जे बदकाने गिळले असतील. लियू म्हणाला की, अशाप्रकारची घटना या भागात सामान्य आहे. कारण याआधीही गावातील काही लोकांना बदकाच्या पोटातून सोन्याचे कण मिळाले आहेत. पण बदकाच्या पोटात इतक्या प्रमाणात सोनं मिळणं ही बाब फार अनोखी आहे. 

सोनं पोटात पचतं का? 

एक्सपर्ट सांगतात की, शरीर सोनं पचवू शकत नाही. सामान्यपणे ते डायजेस्टिव सिस्टीमचं नुकसान न करता बाहेर पडतं. पण जर सोन्याचे मोठे कण असतील आणि अशु्द्ध असतील तर आतडीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. पण काही लोकांना या घटनेवर शंका आहे. स्थानिक प्रशासन म्हणालं की, चौकशीनंतर कळेल की, सापडलेले कण सोनं की अजून काही. ते म्हणाले की, आधीही नदीतून सोनं सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

Web Title : बत्तख के पेट में मिला सोना, मालिक हुआ मालामाल!

Web Summary : चीन में एक किसान को अपनी बत्तख के पेट में ₹1.6 लाख के सोने के कण मिले। संभवतः बत्तख ने चिशुई नदी के किनारे भोजन करते समय सोना निगल लिया, जो सोने के भंडारों के लिए जानी जाती है। अधिकारी जांच कर रहे हैं।

Web Title : Duck's Golden Surprise: Owner Finds Gold in Duck's Stomach!

Web Summary : A Chinese farmer found gold particles worth ₹1.6 lakh inside his duck. The duck likely ingested the gold while foraging in the Chishui riverbed, known for gold deposits. Authorities are investigating the unusual discovery.