VIDEO : वाळवंटात खरेदी केली गुहा, आत बनवलं लक्झरी हॉटेल; कोट्याधीश बनला मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:08 AM2023-08-02T11:08:49+5:302023-08-02T11:11:36+5:30

Luxury Cave Hotel : आता दूरदूरून लोक या केव्ह हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतात आणि इतकंच नाही तर मागितलं तेवढं रेंटही देतात.

Man buy a cave in desert and made it luxury hotel see inside cave amazing video | VIDEO : वाळवंटात खरेदी केली गुहा, आत बनवलं लक्झरी हॉटेल; कोट्याधीश बनला मालक

VIDEO : वाळवंटात खरेदी केली गुहा, आत बनवलं लक्झरी हॉटेल; कोट्याधीश बनला मालक

googlenewsNext

Luxury Cave Hotel :   सामान्यपणे लोक रहिवाशी भागांमध्ये जागा किंवा घर खरेदी करतात. पण एका व्यक्ती वेगळंच केलं. त्याने एका वाळवंटात एक गुहा खरेदी केली. तेव्हा लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं. पण आज तोच कोट्याधीश बनला आहे. कारण त्याने ही गुहा आपल्या कल्पकतेने एका लक्झरी हॉटेलमध्ये बदलली.

आता दूरदूरून लोक या केव्ह हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतात आणि इतकंच नाही तर मागितलं तेवढं रेंटही देतात. 'द सन'च्या वृत्तानुसार, हे हॉटेल अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आहे. इथे एका व्यक्तीने वाळवंटात लक्झरी केव्ह हॉटेल तयार केलं. हे हॉटेल एका डोंगराला पोखरून तयार करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या हॉटेलचे फोटो-व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.

एका यूजरने सांगितलं की, या व्यक्तीने वाळवंटात एक गुहा खरेदी केली आणि क्रिएटिविटी दाखवत गुहेत एक लक्झरी केव्ह हॉटेल तयार केलं. आता इथे मोठ्या प्रमाणात लोक चांगला वेळ घालवण्यासाठी येतात. त्यासाठी ते मागेल तेवढे पैसेही मोजतात. आता तर इथे राहण्यासाठी वेटिंग लिस्ट असते. मालक याद्वारे कोट्याधीश बनला आहे.

गुहा आतून तोडून एक रूम बनवण्यात आली आहे. आत बेडरूम, बाथरूम, बेड, लायटिंगही आहे. आतून बाहेरचा मनमोहक नजारा दिसतो. एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारखं हे हॉटेल आहे. आता अनेकांनी इथे जागा घेणं सुरू केलं आहे.

टिकटॉक यूजरच्या या केव्ह हॉटेलच्या व्हिडिओला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनाही हे अनोखं हॉटेल खूप आवडल्याचं दिसतं.

Web Title: Man buy a cave in desert and made it luxury hotel see inside cave amazing video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.