शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

म्हणून त्याने घेतला कुत्र्याच्या कानाचा चावा, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 3:19 PM

माणूस कुत्र्याला चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हुगळी -  कुत्रा माणसाला चावला तर बातमी होऊ शकत नाही. पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होऊ शकते, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात असा प्रकार सहसा घडत नाही. मात्र पश्चिम बंगालमध्ये माणूस कुत्र्याला चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगालमधील हुगळी जिल्ह्यात एका मद्यधुंद व्यक्तीने भटक्या कुत्र्याचा कान चावला. हा प्रकार पाहिल्यानंतर जमावाने त्या व्यक्तीला पकडून त्याची धुलाई केली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शंभुनाथ धाली, असे कुत्र्याला चावणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो मद्यपी आहे.  पेशाने बांधकाम मजूर असलेला शंभुनाथ हा उत्तरपाडा येथील रस्त्याच्या किनाऱ्यावर झोपायचा. तसेच रोज रात्री मद्यपान करून आल्यावर तो शेजाऱ्यांना त्रास देत असे. त्याच्या अशा वर्तनामुळे भटके कुत्रेही तो दिसल्यावर भुंकायला सुरुवात करत असत, दरम्यान, रविवारी रात्रीसुद्धा तो दारू पिऊन धिंगाणा घालू लागल्यावर कुत्र्यांनी त्याच्यावर भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या शंभुनाथ याने कुत्र्याला पकडून त्याचा कान चावला.  त्याचे हे कृत्य पाहिल्यावर शेजारीपाजारी गोळा झाले. त्यांनी शंभुनाथ याला पकडून त्याची धुलाई केली. तसेच त्याला पोलिसांच्या हवाली केले.  

टॅग्स :dogकुत्राwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी