अबब! चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस; पैसै घेण्यासाठी लोकांची पळापळ, वाचा नेमकं काय घडलं?

By प्रविण मरगळे | Published: November 3, 2020 10:18 AM2020-11-03T10:18:00+5:302020-11-03T10:18:30+5:30

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आकाशातून अशाप्रकारे पैशांचा होणारा पाऊस पाहून रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली

Man arrested after showering commuters with money from 30th-floor window | अबब! चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस; पैसै घेण्यासाठी लोकांची पळापळ, वाचा नेमकं काय घडलं?

अबब! चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस; पैसै घेण्यासाठी लोकांची पळापळ, वाचा नेमकं काय घडलं?

Next

ड्रग्सच्या आहारी जाणं नेहमी लोकांसाठी घातक असतं, पण चीनमध्ये एका व्यक्तीने ड्रग्स घेतल्याने अनेक लोकांना फायदा झाल्याचं दिसून आलं. खरं तर, चीनमधील एका २९ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली कारण त्याने मेथ नावाचं ड्रग्स घेतल्यानंतर घराच्या बाल्कनीमध्ये येऊन रस्त्यावर पैसे उडवणे सुरु केले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आकाशातून अशाप्रकारे पैशांचा होणारा पाऊस पाहून रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली, लोकं पैसे घेण्यासाठी धावू लागले. अनेकांनी आपले खिशे भरून पैसे घेऊन गेले, मात्र यामुळे पोलिसांनी बाल्कनीतून पैसे उडवणाऱ्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याने ड्रग्स घेतल्याचं सिद्ध झालं. पोलिसांकडून त्याच्याविरूद्ध नारकोटिक्स गैरवर्तन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वी नैऋत्य चीनमधील शॉपिंग्बा येथे घडली होती. चिनी पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली की, दुपारी दीडच्या सुमारास, शॅपिंग्बा जिल्ह्यातील बो नावाच्या २९ वर्षीय मुलाने आपल्या घरात मिथ ड्रग्सचं सेवन केले. त्यानंतर नशेमध्ये त्याने घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून पैसे फेकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना हे दृश्य पाहून धक्का बसला, त्यानंतर रस्त्यावर पैसे घेण्यासाठी लोकांची पळापळ झाली, गाड्या थांबल्यानं वाहतूक कोंडी झाली.  

बो ने हे पैसे आपल्या ३० व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली टाकत होता. आकाशातून पैशांचा पाऊस पाहून एका प्रवाशाने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. बोने आपल्या बाल्कनीतून किती पैसे खाली टाकले याचा खुलासा प्रशासनाकडून झाला नाही. अशी अपेक्षा आहे की ज्यांनी बो द्वारे टाकलेले पैसे घेतले आहेत ते परत करतील, परंतु पोलिसांनी अद्याप या प्रकरणात जनतेला कोणतीही अधिकृत विनंती केलेली नाही.

Read in English

Web Title: Man arrested after showering commuters with money from 30th-floor window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.