मुलाच्या बर्थ डे ला दारू ढोसून बापाचा मोठा कारनामा, सकाळी काही आठवतही नव्हतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 04:09 PM2020-03-05T16:09:01+5:302020-03-05T16:10:05+5:30

दारूच्या नशेत लोक काय काय करू शकता याचा तुम्हाला कधीना कधी अनुभव आला असेल. पण या व्यक्तीने चांगलाच मोठा कारनामा केला.

Man accidentally orders 189 chicken pieces on his sons first birthday api | मुलाच्या बर्थ डे ला दारू ढोसून बापाचा मोठा कारनामा, सकाळी काही आठवतही नव्हतं!

मुलाच्या बर्थ डे ला दारू ढोसून बापाचा मोठा कारनामा, सकाळी काही आठवतही नव्हतं!

Next

(Image Credit : moodchimp.worldsecuresystems.com)(सांकेतिक छायाचित्र)

दारूच्या नशेत एखादी काय काय करू शकते याचा तुम्हाला कधीना कधी अनुभव आला असेलच. लगेच अनेकांना त्यांचे त्यांचे एकापेक्षा एक विचित्र अनुभव डोळ्यांसमोर आले असतील. असाच एक अविश्वसनिय किस्सा यूकेतील एकाने केला. आधी तर तो १२ तास दारू ढोसत बसला होता. त्यानंतर त्याने तब्बल १६ हजार रूपयांचं चिकन ऑर्डर केलं.

Lee Rumney असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या मुलाचा वाढदिवस होता. Lee घरी आला तेव्हा त्याने सांगितले की, त्याने जेवणाची ऑर्डर आधीच दिली आहे. यावेळी घरात ली ची गर्लफ्रेन्ड होती. पण जेव्हा ऑर्डर घरी आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

ऑर्डर केलेलं जेवण १९ बॉक्समध्ये पॅक करून आलं होतं. यात १५ स्लाइस चिकन विंग्स होते, एख लार्ज पिझ्झा, एक गार्लिक पिझ्झा, Wedges आणि कुकीज होते. एकूण चिकनचे १८९ पीस होते. आणि याचं बिल झालं होतं १७७ यूरो म्हणजे भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १६ हजार ६०५ रूपये इतकी होते.

Lee च्या गर्लफ्रेन्डने याबाबत सांगितले की, जेवणाची ऑर्डर इतकी मोठी होती की, त्यांनी डिलीव्हरी बॉयलाच ते घरात ठेवण्याच्या कामाला लावलं होतं. त्यानेही मदत केली आणि सगळे बॉक्सेस किचनमध्ये ठेवलेत. त्यानंतर ती ली ला बोलवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. पण तोपर्यंत तो झोपलेला होता. सकाळी तो उठल्यावर त्याने केलेला कारनामा त्याला सांगण्यात आला. ली ने सांगितले की, त्याने अ‍ॅपवमध्ये ऑर्डर देताना केवळ चिकन अ‍ॅड केलं. त्याला हेही आठवत नव्हतं की, त्याने किती चिकन ऑर्डर केलं.


Web Title: Man accidentally orders 189 chicken pieces on his sons first birthday api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.