चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 11:59 IST2024-01-13T11:59:08+5:302024-01-13T11:59:39+5:30

आश्चर्याची बाब म्हणजे मेहुणीही पाच मुलांची आई आहे. परिवारातील लोकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Man absconds with his sister in law from Karnal Haryana | चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती

चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती

हरयाणाच्या करनालमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती आपली पत्नी आणि चार मुलांना सोडून मेहुणीसोबत फरार झाला. आश्चर्याची बाब म्हणजे मेहुणीही पाच मुलांची आई आहे. परिवारातील लोकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सलीम फरूखाबादचा राहणारा आहे. तो त्याच्या विवाहित मेहुणीला घेऊन फरार झाला. ही घटना समोर आल्यावर सगळेच हैराण झाले. मेहुणीला 5 मुलं आहेत आणि आरोपी तरूणाला 4 मुलं आहेत. इतकंच नाहीतर पत्नी पाचव्यांदा गर्भवती आहे.

असं सांगितलं जात आहे की, आरोपीची पत्नी जेव्हा पाचव्यांदा गर्भवती  झाली तेव्हा देखरेख करण्यासाठी मेहुणीला घरी घेऊन आला. तेव्हाचं त्यांचं सुत जुळलं. भाओजी आणि मेहुणी फरार झाल्याची बातमी घरातील लोकांना पाच दिवसांनंतर मिळाली. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याबाबत सांगितलं की, आरोपी यूपीच्या फरूखाबादचा राहणारा आहे. त्याला चार मुलं आहेत आणि त्याची पत्नी गर्भवती आहे. पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याने मेहुणीला घरी बोलवलं होतं. दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू होते. जे कुणालाच कळलं नाही.

आता साधारण 6 ते 7 दिवस उलटून गेले भाओजी आणि मेहुणीचा काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांसोबतच परिवारातील लोकही त्यांचा शोध घेत आहेत. 

Web Title: Man absconds with his sister in law from Karnal Haryana