पृथ्वीवरील सगळ्याच प्राण्यांचं दूध पांढऱ्याचं रंगाचं का असतं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:37 IST2026-01-09T14:04:54+5:302026-01-09T14:37:23+5:30
Milk White Color : तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का की, दुधाचा रंग पांढराच का असतो? इतकंच नाही तर जगातल्या कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो?

पृथ्वीवरील सगळ्याच प्राण्यांचं दूध पांढऱ्याचं रंगाचं का असतं? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर
Why is Color of Milk White : दूध म्हटलं की, एक पातळ पांढरा द्रव पदार्थ आपल्या डोळ्यांसमोर येतो. गायी असो, म्हशी असो, उंट असो, बकरी असो जगातील जवळपास सगळ्यात प्राण्यांच्या दुधाचा रंग हा पांढरा असतो. इतकंच काय आपल्या आईच्या दुधाचा रंग देखील पांढराच असतो. तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केलाय का की, दुधाचा रंग पांढराच का असतो? इतकंच नाही तर जगातल्या कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? क्वचितच कुणी याचा विचार केला असेल आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहीत असेल...त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत.
का असतो दुधाचा रंग पांढरा?
दुधात एक प्रकारचं प्रोटीन आढळतं ज्याला कॅसिन असं म्हटलं जातं. या कॅसिनमुळेच दुधाचा रंग पांढरा होतो. कॅसिन दुधातील कॅल्शिअम आणि फॉस्फेटसोबत मिळून छोटे छोटे कण तयार करतं आणि या कणांना मायसेल् म्हटलं जातं.
जेव्हा प्रकाश या मायसेल्सवर पडतो तेव्हा ते रिफ्लेक्ट होऊन तुटतात आणि त्याच रिफ्लेक्शनुमळे आपल्याला दुधाचा रंग पांढरा दिसू लागतो. त्याशिवाय दुधात असलेल्या फॅटमुळेही दुधाचा रंग पांढरा दिसतो. दुधातील चरबी अतिशय लहान थेंबांच्या स्वरूपात असते. हे थेंबही प्रकाश विखुरतात, ज्यामुळे पांढरा रंग अधिक ठळक दिसतो.
पाण्याचा रंग नसतो
दूध मुख्यतः पाण्याचं बनलेलं असतं, पण पाणी पारदर्शक असतं. मात्र त्यात मिसळलेलं प्रोटीन आणि फॅट हे दूध पांढरं दिसण्याचं कारण बनतात. सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग अगदी सारखाच असतो का? तर नाही.
सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग अगदी सारखाच असतो का?
गाय, म्हैस - दूध शुद्ध पांढरं
शेळी - किंचित फिकट पांढरं
गायीचं दूध पिवळसर दिसू शकतं, कारण त्यात बीटा-कॅरोटीन असतं.
आईचं दूध - थोडं हलकं पिवळसर किंवा निळसर दिसू शकतं
पोषक तत्वांचा खजिना असतं दूध
दूध हे केवळ एक पेय नसून पोषक तत्वांचा खजिना मानलं जातं. एक ग्लास दुधात कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन डी, बी १२, पोटॅशिअम आणि फॉस्फोरस भरपूर प्रमाणात असतात. हे मेंदू, त्वचा, केस आणि हाडांसाठी फायदेशीर असतं. जर जगात सगळ्यात महाग दूध कोणतं? असा प्रश्न असेल तर गाढविणीचे दूध जगात सगळ्यात महागडं असतं. या दुधामध्ये सगळ्यात जास्त पोषक तत्व असतात. गाढविणीचं दूध १२ हजार रूपये प्रति लीटर असतं.