कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधील निर्बंध काही अंशी कमी होतानाही दिसत आहे. निरनिराळ्या राज्यांमध्ये काही नियमासह आता सूट देण्यात आलीये. यानंतर उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केलेलं मजेशीर ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या त्या ट्वीटनंतर अनेक जण त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची वाहवा करत आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. (Anand Mahindra shares funny video on twitter after restrictions lifted by states.)या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दरवाज्याला असलेल्या टाळं (लॉक) दोरीच्या मदतीनं ढील देऊन खाली (डाऊन) करत आहे. "हा वेडेपणाचा जोक असू शकतो. परंतु आपला सेन्स ऑफ ह्युमर कायम आहे याचा मला आनंद आहे. हा व्हिडीओ पुन्हा पाहण्याची वेळ आहे. आता प्रत्येक राज्याचे नेते हे माहित करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांना लॉक किती खाली आणायचं आहे," असं आनंद महिंद्रा म्हणाले.
अनेक राज्यांकडून निर्बंधात सूट देण्यास सुरूवात; आनंद महिंद्रांनी शेअर केलं मजेदार ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:04 IST
Lockdown बाबत आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) केलेलं ट्वीट आहे चर्चेत. नेटकऱ्यांनी केली त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची वाहवा...
अनेक राज्यांकडून निर्बंधात सूट देण्यास सुरूवात; आनंद महिंद्रांनी शेअर केलं मजेदार ट्वीट
ठळक मुद्देLockdown बाबत आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) केलेलं ट्वीट आहे चर्चेत.नेटकऱ्यांनी केली त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची वाहवा...