प्रियकरासोबत मंडपातून पळून जात असलेल्या नवरीला लोकांनी पकडलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:31 IST2023-03-07T12:31:10+5:302023-03-07T12:31:32+5:30

प्रियकरासोबत लग्न करण्यावर अडून बसली. ज्यानंतर पोलिसांनी नवरीला कुटुंबियांच्या हवाली केलं तर प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे. 

Lover ran away from the mandap with bride during the mass wedding ceremony in Fatehpur UP | प्रियकरासोबत मंडपातून पळून जात असलेल्या नवरीला लोकांनी पकडलं आणि मग...

प्रियकरासोबत मंडपातून पळून जात असलेल्या नवरीला लोकांनी पकडलं आणि मग...

यूपीच्या फतेहपूर जिल्ह्यातील सामूहिक विवाह सोहळ्यात मंडपात बसलेल्या एका नवरीला तिचा प्रियकर पळवून घेऊन गेला. पण तिथे असलेल्या नातेवाईकांनी प्रेमी युगुलाला अटक केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. कुटुंबियांनी समजावून सांगितलं तरीही नवरीने ऐकलं नाही आणि प्रियकरासोबत लग्न करण्यावर अडून बसली. ज्यानंतर पोलिसांनी नवरीला कुटुंबियांच्या हवाली केलं तर प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे. 

सोमवारी दिवसा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकूण 124 जोडप्यांची लग्नं झाली आणि यादरम्यानच मंडपात लग्नासाठी बसलेल्या नवरीला घेऊन प्रियकर फरार झाला. नातेवाईकांना त्यांना लगेच पकलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हथगाम ब्लॉकच्या एका गावात राहणाऱ्या तरूणीच्या लग्नासाठी वडिलांनी नोंदणी केली होती. नवरी-नवरदेव दोघेही मंडपात पोहोचले. लग्नाचे रिवाज सुरू होण्याआधीच नवरीने प्रियकराला फोन करून बोलवून घेतलं. तो तिथे पोहोचला आणि नवरील मंडपातून पळवून नेत होता. तेव्हाच नातेवाईकांना त्यांना पकडलं.

पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आई-वडिलांसमोर नवरी म्हणाली की, ती वयस्क आहे आणि तिला तिच्या मनाने जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे. पोलिसांनी तरूणीचा जबाब घेऊन तिला कुटुंबियांकडे सोपवलं तर प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे.

Web Title: Lover ran away from the mandap with bride during the mass wedding ceremony in Fatehpur UP