विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:12 IST2023-06-21T12:07:49+5:302023-06-21T12:12:38+5:30

Rajasthan : महिला आणि तरूणामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे तरूण विवाहित प्रेयासीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे महिलेच्या सासरच्या लोकांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं.

Lover caught with married girlfriend bedroom in Sawai Madhopur in laws beat them badly | विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि...

विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि...

Rajasthan : राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्याच्या गंगापुरसिटी भागात एक महिला आणि तरूणाला खांबाला बांधून मारहाण करण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कुनकटा गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओबाबत सांगण्यात आलं की, महिला आणि तरूणामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे तरूण विवाहित प्रेयासीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे महिलेच्या सासरच्या लोकांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं.

त्यानंतर दोघांना पकडून घरातच एका खांबाला बांधण्यात आलं. नंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरूण अर्धनग्न स्थितीत दिसत आहे. काही लोक त्याला विचारपूस करत आहेत आणि त्याचा व्हिडीओ काढत आहेत. महिला स्वत:ला मारहाणीपासून वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडत आहे.

असं सांगण्यात आलं आहे की, तरूण महिलेला सतत भेटण्यासाठी येत होता. काही दिवसांआधी महिलेच्या सासरच्या लोकांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तरूणाला मारहाण केली. तरीही पुन्हा एकदा तरूण महिलेला भेटण्यासाठी आला होता. पण दोघांना महिलेच्या सासरच्या लोकांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. नंतर दोघांना मारहाण केली.

हेही सांगितलं जात आहे की, आरोपी तरूण दौसा जिल्ह्यातील लालसोटच्या एका कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष राहिला आहे. पोलिसात त्याच्याविरोधात अजून तक्रार दाखल झालेली नाही. पण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Lover caught with married girlfriend bedroom in Sawai Madhopur in laws beat them badly