प्रेयसीसाठी कुवैतहून गावाला आला तरूण, पळवून नेत असताना पोलिसांनी पकडलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 14:46 IST2024-01-17T14:46:04+5:302024-01-17T14:46:27+5:30
चौकशी दरम्यान दोघेही घाबरले होते. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊन बोलवून घेतलं.

प्रेयसीसाठी कुवैतहून गावाला आला तरूण, पळवून नेत असताना पोलिसांनी पकडलं आणि...
यूपीच्या देवरियामध्ये प्रेयसीचं लग्न जुळल्याची माहिती मिळाल्यावर कुवैतमध्ये नोकरी करणारा प्रियकर घरी परत आला. तो लपून आपल्या प्रेयसीला पळवून घेऊन चालला होता. पण रस्त्यात पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. चौकशी दरम्यान दोघेही घाबरले होते. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना माहिती देऊन बोलवून घेतलं.
दोघांनीही पोलिसांना सांगितलं की, त्यांचं लग्न दोन वर्षाआधी ठरलं होतं. पण परिवारातील वादामुळे लग्न मोडलं. नंतर तरूण नोकरीसाठी कुवैतला निघून गेला. तरीही तो प्रेयसीसोबत फोनवर बोलत होता. यादरम्यान जेव्हा तरूणीचं लग्न ठरलं तेव्हा तरूण कुवैतहून देवरियाला पोहोचला. तो तरूणीला घेऊन दिल्लीला जात होता तेव्हाच पोलिसांनी त्यांना पकडलं.
यावर पोलिसांनी सांगितलं की, सकाळी सकाळी त्यांना पकडण्यात आलं. नंतर दोघांच्याही कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. दोन्ही परिवारांच्या सहमतीनंतर दोघांचं लग्न एका मंदिरात लावण्यात आलं. त्यानंतर तरूणी सासरी गेली.
दरम्यान दिनेश कुशवाहा यांची मुलगी रजनी कुशवाहाचं लग्न अमित कुशवाहासोबत ठरलं होतं. पण कौटुंबिक कारणामुळे दोघांचं लग्न मोडलं. यानंतरही तरूण आणि तरूणीचं बोलणं सुरू होतं. यादरम्यान तरूणी कुवैतला नोकरीसाठी गेला.
पण फोनवर दोघेही बोलत होते आणि त्यांचं प्रेम प्रकरण सुरूच होतं. अमितला जेव्हा तिच्या लग्नाची माहिती मिळाली तर तो लगेच कुवैत सोडून देवरियामध्ये पोहोचला. अमितने रजनीला भेटायला बोलावलं आणि तिला घेऊन दिल्लीकडे निघाला. तिथे जाऊन दोघेही लग्न करणार होते. पण पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. ज्यानंतर त्यांचं एका मंदिरात लग्न लावण्यात आलं.