कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या लग्नाच्या डेट पुढ ढकलाव्या लागत आहेत. तर अनेकांची लग्नेही मोडत आहेत. पण अशात एक वेगळी घटना समोर आली आहे. बिहारच्या नरकटियागंजमधील एका मुलाच्या घरच्या लोकांना मुलाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलायची होती. याबाबत त्यांनी मुलीच्या घरण्यांसोबत बोलणी केली आणि विचार करण्यास सांगितले. पण मुलीच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. त्यांना आधी ठरलेल्या तारखेलाच लग्न लावून द्यायचं होतं.
मुलाकडचे लोक यासाठी तयार झाले नाही म्हणून मुलीकडच्या लोकांनी मुलीसाठी गुपचूपपणे दुसरा मुलगा शोधणे सुरू केले. जेव्हा मुलीला घरच्या लोकांच्या या कारमान्याबाबत समजले तर ती पळून तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी गेली. तिथे तिने सुरू असलेला सगळा प्रकार सांगितला आणि मंदिरात लग्न उरकून टाकले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरातील देवी स्थान कॉलनीमध्ये राहणाऱ्या पवन कुमारचं लग्न एकडेरवा गावात राहण्याऱ्या मधु कुमारीसोबत ठरलं होतं. आधी ठरल्याप्रमाणे 23 मे रोजी दोघांचं लग्न होणार होतं. पण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुलाकडील लोकांनी ही तारीख पुढे ढकलली.
आता तारीख पुढे ढकलल्याने मुलीकडील लोक नाराजा झाले आणि त्यांनी परस्पर दुसरा मुलगा शोधणं सुरू केलं. मुलीने याचा विरोध केला तर तिच्यावर घरातील लोकांनी दबाव टाकला. अखेर तिने पळून जाऊन पवन कुमारसोबत लग्न केलं. पोलिसांनुसार, वर-वधू दोघेही वयस्क आहेत. ते त्यांच्या आयुष्याचा विचार स्वत: करू शकतात.
दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....
....म्हणून साखरपुड्याची अंगठी नेहमी डाव्या हातातील अनामिकेत घालतात