बाबो! 'माझं सपनावर प्रेम आहे' सांगत लग्नाच्या 10 दिवसांनंतर पत्नीने पतीला सोडलं अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 11:58 IST2020-06-26T11:57:55+5:302020-06-26T11:58:10+5:30
ही घटना आहे बेगूसराय येथील. या गावात राहणाऱ्या अंकित कुमारचं 14 जून रोजी रांची येथील पूजाचं लग्न झालं होतं.

बाबो! 'माझं सपनावर प्रेम आहे' सांगत लग्नाच्या 10 दिवसांनंतर पत्नीने पतीला सोडलं अन्....
बिहारमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका नव-विवाहित पत्नीने तिच्या पतीला सांगितले की, 'माझं तुझ्यावर नाही तर सपना नावाच्या मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्यासोबत आयुष्य जगायचं आहे'. आता हे ऐकल्यावर दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरूणाला अर्थातच धक्का बसला असेल.
Aajtak ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे बेगूसराय येथील. या गावात राहणाऱ्या अंकित कुमारचं 14 जून रोजी रांची येथील पूजाचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पूजा तिच्या पतीच्या घरी म्हणजे बेगूसरायला गेली. पण लग्नाच्या 10 दिवसांनंतरच पूजाने पतीसोबत राहण्यास मनाई केली.
पूजाने पतीला स्पष्टपणे सांगितले की, ती गेल्या दोन वर्षांपासून सपना नावाच्या मुलीसोबत राहत होती. त्या दोघीही समलैंगिक आहेत. आता तिला सपनासोबतच लग्न करायचंय. हे ऐकल्यावर काही दिवसांपूर्वीत लग्न झालेल्या आणि सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या अंकितच्या पायाखालची जमिनच सरकली. याबाबत अंकितने पोलिसात माहिती दिली.
पोलीस सर्वांनाच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पण या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पूजाची मैत्रीण सपना रांचीहून बेगूसरायला पोहोचली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पूजासोबत राहण्याबाबत बोलू लागली.
(प्रातिनिधीक छायाचित्र) (Image Credit : cutewallpaper.org)
सपना आणि पूजाने सांगितले की, रांचीमध्ये त्या एका कापडाच्या दुकानात काम करतात. इथेच दोघींचं एकमेकींवर प्रेम जडलं. दोघीही गेल्या दोन वर्षांपासून सोबत राहत होत्या. यादरम्यान 14 जूनला पूजाचं लग्न घरातील लोकांनी अंकितसोबत लावून दिलं. पण पूजा या लग्नाने अजिबात आनंदी नव्हती.
पूजा म्हणाली की, तिचं सपनावर प्रेम आहे आणि तिच्यासोबतच तिला लग्न करायचं आहे. इतकेच नाही तर सपना सुद्धा पूजाला आपली पत्नी मानते. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यावर मुलाने पूजाला लग्नाच्या बंधनातून मुक्त केलंय.
बोंबला! लग्नाची तारीख वाढवण्यास तयार नव्हते घरातील लोक, मुलीने चक्क पळून जाऊन केले लग्न!
दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....