A lady documented how his boyfriend have changed from six pack to Dadbod after being in relationship with her | जेव्हा सिंगल होता तेव्हा बॉडीमुळे खात होता भाव, गर्लफ्रेन्ड मिळाली तर आता झाले असे हाल!

जेव्हा सिंगल होता तेव्हा बॉडीमुळे खात होता भाव, गर्लफ्रेन्ड मिळाली तर आता झाले असे हाल!

नेहमीच पाहिलं जातं की, काही तरूणांना ब्रेकअपनंतर स्वत:ला सांभाळायला बराच वेळ लागतो. तर काही असे असतात की, जे त्यांच्या आतील फ्रस्ट्रेशन, रागाला आपली ताकद बनवतात. याचा फायदा ते बॉडी बनवण्यासाठी घेतात. पण एका केसमध्ये जरा वेगळं आहे.

टिकटॉकवर हॉली नावाच्या एका तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलेने सांगितले की, तिचा बॉयफ्रेन्ड तिला भेटण्यापूर्वी सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवून फिरत होता. पण त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यापासून तो फारच आळशी झाला आहे. या महिलेने व्हिडीओत सांगितले की, मला डेट करण्याआधी माझ्या बॉयफ्रेन्डची बॉडी एकदम एथलीटसारखी होती. त्याचे अ‍ॅब्स होते आणि शार्फ फीचर होते.

यानंतर आमची भेट झाली आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. त्यानंतर तो त्याच्या फिटनेसबाबत फारच कॅज्युअल झाला. तो फिटनेसला हलक्यात घेऊ लागला. म्हणजे दुर्लक्ष करू लागला. हॉली म्हणाली की, मला डेट करण्याच्या दीड वर्षानंतर त्याचे सिक्स पॅक अ‍ॅब्स गेले आहेत. हॉलीने याचं कारण लॉकडाऊन असल्याचंही म्हटलं आहे. कारण तो लॉकडाऊनमुळे जिममध्ये जाऊ शकला नाही.

दरम्यान गेल्या एक-दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे जगभरातील जिम बंद झाले आहेत. आणि अनेक लोकांना घरीच एक्सरसाइज करावी लागत आहे. हॉली म्हणाली की, तिच्या बॉयफ्रेन्डला यामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी याने ऑनलाइन ट्रेनर्सचा चांगलाच फायदा झाला आहे. 
 

Web Title: A lady documented how his boyfriend have changed from six pack to Dadbod after being in relationship with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.