काय सांगता! लॉकडाऊनमध्ये भूक नसताना सुद्धा खाण्याच्या सवयीमागे दडलयं जपानचं 'हे' गुपीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 13:51 IST2020-05-20T13:49:55+5:302020-05-20T13:51:38+5:30
लॉकडाऊनच्या काळात भूक नसताना सुद्धा खायची सवय लागली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूक नसताना सुद्धा खाण्याची इच्छा का होते.

काय सांगता! लॉकडाऊनमध्ये भूक नसताना सुद्धा खाण्याच्या सवयीमागे दडलयं जपानचं 'हे' गुपीत
लॉकडाऊनमध्ये तुमचं सुद्धा लक्षं सतत रेफ्रिजरेटरकडे जात असावं. लॉकडाऊनच्या काळात भूक नसताना सुद्धा खायची सवय लागली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूक नसताना सुद्धा खाण्याची इच्छा का होते. तर या प्रश्नाचं उत्तर मुळची जपानी असलेली संकल्पना खुचीसाबीशी यात दडलं आहे. या जपानी शब्दाचा अर्थ lonely mouth म्हणजेच रिकामं तोंड असा होतो. त्यामुळे सतत खाण्याची इच्छा होते.
द हफिंगटन पोस्ट में प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार जापानचे लँग्वेज इंस्ट्रक्टर केविन मार्क्स यांच्यामते जपानमध्ये लोक बोर झाल्यानंतर या शब्दाचा वापर करतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या इच्छेविरुद्ध घरात बसून राहावं लागतं. जेव्हा त्यांना बोर झाल्यासारखं वाटतं तेव्हा पॉपकॉर्न खातात. लॉकडाऊनमध्ये हा प्रकार खूपच वाढला आहे. या सवयीला जपानी लोक Kuchisabishii असं म्हणतात. हिंदीमध्ये या शब्दाला कूचीसाबिसे तर इंग्रजीत या शब्दाला peckish असं म्हणतात. या अर्थ उपाशी असणं असा होतो. जपानमध्ये Kuchisabishii ही संकल्पना दारू किंवा सिगारेटच्या इच्छेसाठी सुद्धा वापरली जाते.
जपानी शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार पारंपारिक जपानी जेवणासाठी हा शब्द वापरला जातो. याव्यतिरिक्त असे अनेक शब्द आहेत. जे लॉकडाऊनच्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य ठरतात. जपानमध्ये butori हा शब्द वजन वाढण्याला म्हणजेच लठ्ठपणासाठी वापरला जातो. लॉकडाऊनमध्ये अनेकांना घरी बसून लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे.
महिलेच्या पोटात सतत होत होत्या असह्य वेदना, ऑपरेशन करून जे काढलं ते पाहून हैराण झाले डॉक्टर....
आश्चर्य! चक्क 8 इंच लांबीचा रॉड घुसला होता डोक्यात, डॉक्टरांनी 'असा' वाचवला जीव!