आश्चर्य! चक्क 8 इंच लांबीचा रॉड घुसला होता डोक्यात, डॉक्टरांनी 'असा' वाचवला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:23 PM2020-05-20T13:23:32+5:302020-05-20T13:32:50+5:30

इतका मोठा रॉड तोही डोक्यात गेलाय म्हटल्यावर कुणालाही वाटेल की, व्यक्तीचं वाचला नसेल. पण ही व्यक्ती सुखरूप आहे.

असे नेहमीच सांगितले जाते की, शरीराचा सर्वात मजबूत आणि कमजोर अवयव डोकं असतं. अनेकदा डोक्यावर छोटीशी जरी जखम झाली तर व्यक्ती गंभीर आजारी पडतो. तर अनेकदा डोक्याला फार मोठी जखम झाली तरी व्यक्ती त्यातून वाचतो. (All Image Credit : DailyMail)

अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात तब्बल 8 इंच लांबीचा रॉड घुसला होता. इतका मोठा रॉड तोही डोक्यात गेलाय म्हटल्यावर कुणालाही वाटेल की, व्यक्तीचं वाचला नसेल. पण ही व्यक्ती सुखरूप आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचं वय 52 वर्षे आहे. त्याला गुआंग्डोंगच्या People हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथेच त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. त्याच्या ब्रेनची सर्जरी करून 8 इंच लांब खिळ्यासारखा रॉड काढण्यात आला.

ही व्यक्ती बिल्डींगमध्ये काम करत होती. त्यावेळी त्याच्या डोक्यात हा रॉड गेला. सुदैवाने सोबत काम करणाऱ्यांनी वेळीच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

डॉ. Zhao यांनी या व्यक्तीवर सर्जरी केली. त्यांनी सांगितले की, 'रॉड रूग्णाच्या डोक्याच्या मधोमध घुसला होता. हा रॉड मेंदूच्या दुसऱ्या भागाला स्पर्शू शकत होता. मुख्य रिस्क ही होती की, सर्जरी करताना जास्त रक्त जाऊ नये'.

ही सर्जरी तब्बल तीन तास चालली. रात्री 8 वाजता सुरू केलेली सर्जरी 11.45 ला संपली. आता ही व्यक्ती 42 दिवसांसाठी कोमात राहतील. पण सध्या रूग्ण रिकव्हर होत आहे. तो त्याच्या परिवारातील लोकांनाही ओळखू लागला आहे.