कोणत्याही रेल्वेत जनरल डबे नेहमी सगळ्यात पुढे किंवा शेवटीच का असतात? कारणं अशी कधी विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:33 IST2026-01-06T12:33:02+5:302026-01-06T12:33:32+5:30
Indian Railway Interesting Facts : रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.

कोणत्याही रेल्वेत जनरल डबे नेहमी सगळ्यात पुढे किंवा शेवटीच का असतात? कारणं अशी कधी विचारही केला नसेल
Indian Railway Interesting Facts : रेल्वेने आपण अनेकदा प्रवास केला असेल. कधी तर आपण जनरल डब्यानेही प्रवास केला असेल. आपण पाहिलं असेल की, रेल्वेत जनरल डबे हे नेहमीच रेल्वेच्या सुरूवातीला आणि शेवटी असतात. पण कधी प्रश्न पडलाय का की, जनरल डबे सुरूवातीला आणि मागेच का असतात? कदाचित पडला नसेल. पण तरीही आज आम्ही यामागचं कारण आपल्याला सांगणार आहोत. मुळात रेल्वेकडून असं खूप विचारपूर्वक करण्यात येतं. रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.
आपल्याला हे माहीत असायला हवं की, काही मोजक्या रेल्वे सोडता. प्रत्येक रेल्वेचं स्ट्रक्चर जवळपास एकसारखं असतं. म्हणजे इंजिननंतर किंवा सगळ्यात मागे जनरल डबा आणि मधे AC-3, AC-2 आणि स्लीपर कोच लावले जातात. जनरल डबे मागे किंवा पुढे लावण्यावर एका प्रवाशाने तर रेल्वेवरच जनरल डबे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा आरोप लावला होता. पण मुळात असं काही नाहीये.
रेल्वे विभागावर आरोप आणि समोर आलं कारण...
एक्स प्लॅटफॉर्मवरून एका व्यक्तीने रेल्वे विभागावर आरोप केला होता की, रेल्वेचे जनरल डबे यासाठी रेल्वेच्या मागे किंवा पुढे असतात जेणेकरून दुर्घटना झाल्यावर सगळ्यात जास्त नुकसान गरीब प्रवाशांचं व्हावं. पण रेल्वे विभागाने त्याचे आरोप फेटाळून लावत सांगितलं की, रेल्वे संचालनाच्या नियमांनुसारच डब्यांची जागा ठरते. यात श्रेणी महत्वाची नसते.
काय असतं नेमकं कारण...
जनरल डबे या क्रमात प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा लक्षात ठेवून लावले जातात. सोबतच जनरल डबे मागे-पुढे लावल्याने रेल्वेचा बॅलन्सही बरोबर राहतो. रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. अशात जर जनरल डबे मधे असले तर जास्त भार मधे पडेल आणि यामुळे रेल्वेचा बॅलन्स बिघडू शकतो. असं झालं तर बोर्ड-डीबोर्डमध्ये अडचण येऊ शकते. जनरल डबे मधे ठेवले तर सिटिंग अरेंजमेंटसोबत इतर व्यवस्थाही व्यवस्थित होणार नाही. यामुळे इतर डब्यांमधील प्रवाशी त्यांच्या बॅग घेऊन एकीकडून दुसरीकडे जाऊ शकणार नाहीत. याच कारणाने जनरल डबे प्रवाशांच्या सोयीसाठी दोन टोकांवर लावले जातात.
इमरजन्सीमध्ये फायदेशीर
रेल्वे एक्सपर्ट्स यांचं यावर मत आहे की, जनरल डबे रेल्वेच्या दोन्ही टोकांवर असणं सेफ्टीच्या दृष्टीनेही चांगलं आहे. असं केल्याने जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी अंतरामुळे दोन भागांमध्ये विभागली जाते. याने कोणत्याही आपातकालीन स्थितीत लोकांना रेल्वेतून बाहेर निघणं सोपं होतं.
कोचवर H1 चा बोर्ड लावण्याचं कारण
आपण अनेकदा H1 साईन असलेला बोर्ड बघितला असेलच. हा बोर्ड यासाठी लावला जातो कारण प्रवाशाला कळावं की, हा कोच किंवा डबा एसी फर्स्ट क्लास (AC First Class) चा आहे. ही भारतीय रेल्वेची सगळ्यात प्रीमिअम आणि महागडी श्रेणी असते. यात प्रवाशाला खाजगी कॅबिन आणि चांगल्या सुविधा दिल्या जातात. H अक्षर 'First Class' ला दर्शवतं आणि '1' ही त्या कोचची क्रम संख्या आहे.