काय सांगता! 3 कोटी रूपयांना विकला जातो हा साप, पण याला ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड का आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:43 IST2023-02-16T15:43:02+5:302023-02-16T15:43:20+5:30
Rare Snake : मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो.

काय सांगता! 3 कोटी रूपयांना विकला जातो हा साप, पण याला ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड का आहे?
Rare Snake : एका दुर्मिळ प्रजातीच्या सापाची तस्करी केल्या जात असल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. या सापाला मांडूळ असंही म्हटलं जातं. मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. चला जाणून घेऊ या सापाविषयी आणखी काही खास गोष्टी....
कुठे राहतो हा साप?
हा साप जास्त करून वाळूमध्ये राहतो. अॅनाकोंडाप्रमाणे या सापाचे डोळे डोक्यावर असतात. शिकारीसाठी हा साप वाळूमध्ये स्वत:ला लपवतो आणि केवळ त्याचं डोकं वर राहतं. शिकार जवळ येताच त्यावर हल्ला करतो. परदेशात अनेकजण हा साप पाळतात सुद्धा. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.
प्रजननाचं माध्यम
मांडूळ सापांमध्ये प्रजनन मादा द्वारे अंडी देऊन होतं. जन्मावेळी सापाची लांबी आठ ते दहा इंच इतकी असते. त्यांचा प्रजननाचा काळ हा पानझळ किंवा थंडीच्या दिवसात असतो.
कुठे आढळतात हे साप?
या सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येतात. एक प्रजाती उत्तर अमेरिकेतील मुख्य रूपाने प्रशांत महासागराच्या तटावर आढळून येते. एक प्रजाती यूरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते. तर भारतात आणि आफ्रिकेतही एक प्रजाती आढळते.
काय खातात आणि कशी करतात शिकार?
इतर सापांप्रमाणेच हा साप देखील मांसाहारीच आहे. या सापांच्या राहण्याच्या ठिकाणाच्या आधारावर शिकार वेगवेगळे असतात. तसे हे साप जास्त करून उंदीर, पाल, बेडूक, ससे इत्यादी शिकार करतात. वाळूच्या खाली लपून हा साप शिकारीची वाट बघतो. शिकार जवळ आल्यावर आपल्या धारदार दातांनी त्यावर हल्ला करतो. तसेच शिकार बेशुद्ध होईपर्यंत त्यांचं रक्त पित राहतो.
कशासाठी वापरतात?
असे म्हणतात की, या सापाचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी आणि लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. याने इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या दूर होत असल्याचं बोललं जातं. त्यासोबतच सांधेदुखीवरही याचा वापर केला जातो. तर मलेशियात या सापाबाबत एक अंधविश्वास प्रचलित आहे. लोक इथे मानतात की, लाल मांडूळ साप व्यक्तीचं नशीब चमकवू शकतो. तसेच या सापाची कातड्याचा वापर कॉस्मेटिक्स, पर्स, जॅकेटसाठीही केला जातो.