अभिनेत्री पूनम पांडेने असा दावा केला होता की, टीम इंडियाने जर वर्ल्ड कप जिंकला तर ती टीम इंडियासाठी न्यूड पोज देईल असा दावा केला होता. त्यामुळे चांगलीच खळबळही उडाली होती. पण ते सगळं तिने पब्लिसिटीसाठी केलं होतं. पूनमसारखंच एक स्टेटमेंट एका तरूणीने केलं आहे. ती काही लोकांना तिचे न्यूड फोटो पाठवत आहे. पण याचं कारण आहे ऑस्ट्रेलियातील आग पीडितांना लोकांनी जास्तीत जास्त मदत करावी. 

ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील आगीने सर्वांना चटका दिला आहे. जगभरातील लोक आता कोणत्याना कोणत्या पद्धतीने मदतीसाठी पुढे येत आहे. अनेकांना मोठी रक्कम आधीच दान केली आहे. अशात एका मॉडेलने मदतीसाठी एक अनोखी आयडिया लावली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही आयडिया वापरून या मॉडेल ८ कोटी रूपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा केली आहे.

ज्या मॉडलबाबत आम्ही सांगत आहोत त्या मॉडलचं नाव कॅलेन वार्ड असं आहे(Kaylen Ward). कॅलेनने नुकतंच सोशल मीडियातून एक आवाहन केलं होतं. त्यात ती म्हणाली होती की, जे कुणी १० डॉलर(७०० रूपये) किंवा त्यापेक्षा अधिक डोनेशन देतील त्यांना ती तिची न्यूड सेल्फी पाठवेल.

सोशल मीडियात कॅलेनची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर तिच्याकडे डोनेशनची रक्कमही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. मात्र, न्यूड फोटो शेअर केल्यावर इन्स्टाग्रामने तिचं अकाउंट ब्लॉक केलंय.

तेच कॅलेनने ट्विटरवर अशा काही संस्थांची यादीही शेअर केली आहे जे ऑस्ट्रेलियातील आग पीडितांना मदत करत आहेत. कॅलेनच्या पोस्टला एका दिवसात २० हजारपेक्षा मेसेज आले आहेत. याचा एक व्हिडीओही कॅलेनने शेअर केला आहे.

सोशल मीडिया पोस्टनुसार, कॅलेनने आतापर्यंत ८ कोटी रूपयांचं डोनेशन जमा केलंय. पण आता यात किती खरं आणि किती खोटं हे आम्हाला माहीत नाही. भलेही हा मार्ग विचित्र असला तरी यातून लोकांना मदत मिळेल तर काय वाईट अशाही काही प्रतिक्रिया लोक देत आहेत.


Web Title: Kaylen Ward with nude photos raised more than 1 million dollor for Australian bushfire relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.