शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशीच गायब झाला नवरदेव, तिचं दुसऱ्याशी लग्न झाल्यावर परतला आणि अजब सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 16:34 IST

वधु मंडपी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुण्या्ंच्या स्वागताचीही पूर्ण तयार झाली होती. पण...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh News) कानपूरमध्ये (Kanpur Groom run away on marriage day) एका लग्ना दरम्यान ऐनवेळी नवरदेव अचानक गायब झाला. यानंतर मुलीच्या परिवाराचा सन्मान ठेवण्यासाठी एका नातेवाईकाने त्याच्या भावासोबत तरूणीचं लग्न लावून दिलं ही घटना कानपूरच्या पालेहपूर गावातील आहे. या गावातील श्रीराम प्रजापती यांच्या घरात लग्नाची जोरदार तयारी केली सुरू होती. सांयकाळी त्यांची मुलगी शशीचं लग्न होणार होतं.

रायपूर गावातून वरात येणार होती. आणि ते वरातीतील पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. तेच दुसरीकडे नवरदेव धर्मेंद्रचे वडील धर्मपालही आपल्या मुलाच्या लग्नावरून आनंदी होते. तेही तयारीला बिझी होते. केसांना रंग लावण्यासाठी ते मुलाला सोबत घेऊन सलूनमध्ये गेले. मुलगा काहीतरी करणार याची त्यांना भनकही नव्हती. (हे पण : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

जेव्हा धर्मपाल केसांना रंग लावत होते तेव्हा सलून त्यांचा मुलगा अचानक गायब झाला. बराच वेळ तो घरी परतला नाही त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ही माहिती मुलीकडच्यांना लागली तेव्हा तर गोंधळ आणखीनच वाढला. वरात जाण्यासाठी तयार होती, पण नवरदेवाचा सायंकाळपर्यंत काहीच पत्ता नव्हता. नवरी सजून-धजून नवरदेवाची वाट बघत होती. नंतर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. (हे पण वाचा बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....)

रात्री ११ वाजेपर्यंत नवरदेवाचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे नवरी रडायला लागली. लग्न जुळवणाऱ्या व्यक्तीने नवरीची स्थिती बघून आपला भाऊ महेशसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवरीच्या घरचे लोकही सन्मान वाचवण्यासाठी लग्नास तयार झाले. नवरीही यासाठी तयार झाली आणि दोघांचं लग्न लावून दिलं गेलं.

आश्चर्याची बाब म्हणजे तरूणीच्या लग्नाच्या दोन दिवसांनंतरच बेपत्ता नवरदेव धर्मेंद्र आपल्या घरी परत आला. त्याने त्याच्या आई-वडिलांना खोटी कारणे सांगितली. तो म्हणाला की त्याला कुणीतरी इंजेक्शन दिलं आणि त्याला किडनॅप केलं होतं. जेव्हा पोलिसांनी धर्मेंद्र पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने खरं खरं सांगितलं. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)

तो म्हणाला की, लग्नाच्या दोन दिवसांआधीच तो गावातील त्याच्या प्रेयसीला घेऊन पळून गेला होता. पण घरातील लोकांनी पकडलं होतं. त्याने सांगितलं की, त्याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. पण घरातील लोक ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तो लग्नाच्या दिवशी संधी बघून गायब झाला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttam Nagar Policeउत्तम नगर पोलीसUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न