एक असं गाव जेथील लोक राहतात 'उंदराच्या बिळात', उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात होतात घरे गरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:00 IST2021-08-25T18:57:15+5:302021-08-25T19:00:13+5:30
आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जेथील सगळे लोक 'उंदराच्या बिळात' राहतात. ईराणमधील कंदोवन गाव प्रसिद्ध आहे. येथील शेकडो वर्षांपासून इथे राहतात.

एक असं गाव जेथील लोक राहतात 'उंदराच्या बिळात', उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात होतात घरे गरम
आपण नेहमीच उंदरांना त्यांच्या बिळात जाताना बघतो. इतकंच नाही तर आपण आपल्या बालपणी हा विचार नक्कीच करतो की, अखेर हे उंदीर कसे त्यांच्या बिळात राहतात. पण तुम्ही कधी मनुष्यांना उंदराच्या बिळात राहताना पाहिलं का? नाही ना. पण आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जेथील सगळे लोक 'उंदराच्या बिळात' राहतात. ईराणमधील कंदोवन गाव प्रसिद्ध आहे. येथील शेकडो वर्षांपासून इथे राहतात.
का प्रसिद्ध आहे कंदोवन?
तसे तर जगभरात असे अनेक गाव आहेत जे आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जातात तर काही गाव त्यांच्या अजब परंपरांसाठी ओळखले जातात. मात्र, कंदोवनमधील लोक अशा घरांमध्ये राहतात जे उंदरांच्या बिळासारखेच आहेत. हे ऐकायला जरा विचित्र वाटतं, पण हे सत्य आहे. येथील लोक त्यांची घरे उंदराच्या बिळासारखी बनवतात. चला जाणून घेऊ यामागचं रहस्य...
उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम
हे घर दिसायला अजब असतील, पण राहण्यासाठी फारच आरामदायक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाव ७०० वर्ष जुनं आहे. इथे राहणाऱ्या लोकांना ना हीटरची गरज पडत ना एसीची. उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात आणि हिवाळ्यात गरम राहतात.
येथील लोकांनुसार, इथे राहणाऱ्या लोकांनी हे गाव मंगोलांपासून वाचवण्यासाठी बनवलं होतं. कंदोवनमधील प्रारंभिक निवासी इथे मंगोलांपासून वाचण्यासाठी आले होते. ते लपण्यासाठी ज्वालामुखीच्या डोंगरांमध्ये जागा शोधत होते. आणि तिथेच राहत होते.