Jessica Cox worlds first licensed Armless pilot and she is Guinness world record holder | जबरदस्त! भेटा जेसिकाला जी पायांनी उडवते विमान, स्कूबा डायविंग अन् घोडेस्वारीचीही आवड! 

जबरदस्त! भेटा जेसिकाला जी पायांनी उडवते विमान, स्कूबा डायविंग अन् घोडेस्वारीचीही आवड! 

अमेरिकेतील जोसिका कॉक्स त्या लोकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे जे जीवनाला हार मानतात. जेसिका जगातली पहिली ब्लॅक बेल्ट आणि एकुलती एक आर्मलेस पायलट आहे. जेसिका तिच्या पायांनी विमान उडवते. ती जगातली पहिली लायसन्स असलेली आर्मलेस पायलट आहे. यासाठी तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. चला जाणून तिच्याबद्दल आणखी काही...

२२ व्या वर्षी विमान उडवायला शिकली

जेसिकाचा जन्म १९८३ मध्ये अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामध्ये हात नसलेल्या स्थितीतच झाला होता. सुरुवातीला तिने कृत्रिम हातांचा वापर केला. पण १४ वर्षांची झाल्यावर तिने कृत्रिम हातांना दूर केले आणि सर्व कामे पायांनी करु लागली. जेसिकाने वयाच्या २२व्या वर्षी प्लेन उडवणे शिकले होते आणि केवळ ३ वर्षात तिला लायसन्सही मिळाले. 

पायांनी काय काय करु शकते?

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जेसिका तिच्या पायांचा वापर हातांप्रमाणेच करते. ती पायांच्या मदतीने कार चालवते, गॅस भरते, डोळ्यांच्या लेन्सेस लावते, स्कूबा डायविंग करते आणि कीबोर्डवर पायांनीच टायपिंग सुद्धा करते. आश्चर्याची बाब म्हणजे तिचा टायपिंग स्पीड २४ शब्द प्रति मिनिट इतका आहे. 

३४ वर्षीय जेसिकाला सर्फिंग, स्कूबा डायविंग, घोडेस्वारी आणि प्लेन उडवण्याची आवड आहे. कीबोर्डवर टायपिंग करण्यासोबतच ती पायांच्या बोटांमध्ये पेन धरुन लिहिते सुद्धा. इतकेच नाही तर स्वत: शूजची लेसही बांधते. 

पायाच्या बोटातच लग्नाची रिंग

जेसिकाचं लग्न झालं आहे. जेव्हा तिचं लग्न झालं होतं, तेव्हा तिच्या होणारा पती पॅट्रिक चेंबरलेनने तिला पायातच रिंग घातली होती. जेसिका एक मोटिवेशनल स्पीकरही आहे. खरंच जेसिकाच्या हिंमतीला आणि जिद्दीला सलाम करावा असंच तिचं जगणं आहे. 

Web Title: Jessica Cox worlds first licensed Armless pilot and she is Guinness world record holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.