फक्त एका बंगल्याच्या किमतीत विकत मिळतंय बेट, तेही हॅलिपॅड अन् पेंटहाऊससह; वाचा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:52 PM2022-08-05T18:52:11+5:302022-08-05T18:52:36+5:30

प्लाडा हे सुंदर स्कॉटिश बेट (Scottish Island) एका आलिशान बंगल्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण हे संपूर्ण बेट 3,50,000 पौंड म्हणजेच साडेतीन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीत विकलं जात आहे. हे बेट खरेदी करून तुम्ही तिथे तुमच्या सोयीनुसार राहू शकता.

island in the budget of bungalow with penthouse and helipad | फक्त एका बंगल्याच्या किमतीत विकत मिळतंय बेट, तेही हॅलिपॅड अन् पेंटहाऊससह; वाचा अधिक

फक्त एका बंगल्याच्या किमतीत विकत मिळतंय बेट, तेही हॅलिपॅड अन् पेंटहाऊससह; वाचा अधिक

Next

आयुष्यात एखादा विलासी छंद जोपासायची इच्छा अनेकांना असते; पण परिस्थिती आणि बजेटच्या अभावी ते शक्य होत नाही. आता जगात कोणतीही व्यक्ती राजा-महाराजा नाही. त्यामुळे ती स्वतःसाठी संपूर्ण शहर विकत घेऊ शकत नाही; पण ही इच्छा पूर्ण करणं फारसं अवघड नाही. कारण स्कॉटलंडच्या (Scotland) सुंदर भूमीवरचं एक बेट (Island) एका आलिशान बंगल्याच्या किंमतीला विकलं जात आहे. आतापर्यंत फक्त राजघराण्यात जन्म घेतल्यानेच राजा होता येतं असं तुम्हाला वाटत असेलच मात्र आता प्रत्यक्षात ही संधी अगदी सहज मिळत आहे. हा विनोद नाही. प्लाडा हे सुंदर स्कॉटिश बेट (Scottish Island) एका आलिशान बंगल्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल; पण हे संपूर्ण बेट 3,50,000 पौंड म्हणजेच साडेतीन कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीत विकलं जात आहे. हे बेट खरेदी करून तुम्ही तिथे तुमच्या सोयीनुसार राहू शकता.

इतकं स्वस्तात संपूर्ण बेट का मिळतंय?
स्कॉटलंडमधल्या ऐरन किनाऱ्यावरच्या आयलॅंड प्लाडा बाजारात हे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बेटावर सध्या कोणीही राहत नाही. खरं तर या बेटावर दीपगृह (Lighthouse), हेलिपॅड आणि राहण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. `डेली रेकॉर्ड`ने दिलेल्या वृत्तानुसार, एड्रोसन ते कॅम्पबेल्ट टाउनपर्यंत बोटीनं जाता येतं. हे बेट 700 मीटर लांब असून, 33 एकर परिसरात विस्तारलेलं आहे. हे बेट टिअर शेपमध्ये (Tear Shape) असून, ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. क्नाइट फ्रॅंकचे इस्टेट एजंट टॉम स्ट्युअर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, `या बेटावर पारंपरिक पद्धतीची घरं आहेत. तसंच 2.5 एकरावर हेलिपॅड उभारण्यात आलं आहे. या बेटावर पक्ष्यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत.`

3.36 कोटींमध्ये खरेदी करू शकता बेट
सध्या या संपूर्ण बेटाची किंमत 3,50,000 पौंड म्हणजेच 3 कोटी 36 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. ब्रिटनमध्ये या किमतीत एक फ्लॅट मिळतो. भारताचा विचार करता, या किमतीत येथे एक चांगला बंगला 3.3 कोटींना मिळू शकतो. हे बेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जुनं लाइटहाउस कीपरचं घरदेखील मिळेल. या घरात पाच बेडरूम, दोन सीटिंग रूम्स आणि एक बाथरूम आहे. येथे 2.5 एकरावर एक बाग (Garden) आहे. या संपूर्ण बागेला दगडी संरक्षक भिंत आहे. या बागेत तुम्ही फळं आणि भाजीपाल्याचं उत्पादन घेऊ शकता. याशिवाय या परिसरात आणखी एक घर असून, त्यात बेडरूम, शॉवर रूम, किचन आणि सीटिंग रूम आहेत. या बेटावर राहणाऱ्या व्यक्तीचा दीपगृहाशी काहीही संबंध नसेल. कारण हे दीपगृह नॉर्दर्न लाइटहाउस बोर्डाच्या मुख्यालयातून ऑपरेट केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या बेटावर कोणीही राहत नाही.

Web Title: island in the budget of bungalow with penthouse and helipad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.