अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:22 IST2026-03-14T17:21:33+5:302026-03-14T17:22:10+5:30

Can Medicine Protect From Nuclear Radiation: असं मानलं जाते की ही औषधं अणुबॉम्ब हल्ल्यानंतर होणाऱ्या रेडिएशनपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात. पण खरंच अशी औषधे काम करतात का? ती किती प्रभावी असतात? चला जाणून घेऊया.

Iran, Israel - US War : Can any medicine protect you from nuclear radiation | अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर?

अण्वस्त्र हल्ल्यातून होणाऱ्या रेडिएशनपासून बचावासाठी औषध आहे का, असेल तर किती फायदेशीर?

Can Medicine Protect From Nuclear Radiation: इराणवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यानंतर पर्शियन गल्फ परिसरातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत चालली आहे. त्यामुळे जर परिस्थिती अशीच बिघडत राहिली तर तिसरे महायुद्ध सुरू होईल की काय अशी शंका अनेकांच्या मनात येतीये. यामुळे लोकांच्या मनात अण्वस्त्र हल्ल्याची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये पोटॅशिअम आयोडिइड या औषधाची मागणी अचानक वाढली आहे. असं मानलं जाते की ही औषधं अणुबॉम्ब हल्ल्यानंतर होणाऱ्या रेडिएशनपासून काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात. पण खरंच अशी औषधे काम करतात का? ती किती प्रभावी असतात? चला जाणून घेऊया.

अण्वस्त्र हल्ल्यानंतर काय होते?

World Health Organization (WHO) च्या अहवालानुसार, अण्वस्त्र दुर्घटना किंवा हल्ल्यानंतर वातावरणात   रेडिओअॅक्टिव आयोडाइन पसरू शकतो. हा पदार्थ हवेमार्फत पसरून माती, पाणी, अन्न आणि आसपासच्या वस्तूंनाही दूषित करू शकतो. कधी-कधी तो त्वचा आणि कपड्यांवरही जमा होतो, ज्यामुळे बाह्य रेडिएशनचा धोका निर्माण होतो. असा पदार्थ त्वचेवर लागला तर तो गरम पाणी आणि साबणाने धुऊन काही प्रमाणात काढून टाकता येतो. पण खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हा रेडिओॲक्टिव्ह आयोडीन श्वासावाटे शरीरात जातो किंवा दूषित अन्न-पाण्यातून शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेल्यानंतर तो थायरॉइड ग्रंथीमध्ये जमा होतो. कारण मानवी शरीर आयोडीन नैसर्गिकरित्या थायरॉइडमध्ये साठवते तो सामान्य आयोडीन असो किंवा रेडिओॲक्टिव्ह आयोडीन.

कोणती औषधे उपयोगी ठरू शकतात?

World Health Organization ने रेडिओलॉजिकल आणि अण्वस्त्र आपत्कालीन परिस्थितीसाठी काही महत्त्वाच्या औषधांची यादी तयार केली आहे. त्यात पोटॅशिअम आयोडाइड चा समावेश आहे. या गोळ्यांचा उद्देश शरीरावर होणारा रेडिएशनचा परिणाम कमी करणे किंवा थांबवणे हा असतो. उदाहरणार्थ, आयोडीनच्या गोळ्या थायरॉइड ग्रंथीला रेडिओॲक्टिव्ह आयोडीन शोषण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात.

याशिवाय काही खास औषधे शरीरात गेलेले रेडिओॲक्टिव्ह घटक बाहेर काढण्यास मदत करतात. काही औषधे तीव्र रेडिएशन सिंड्रोम झाल्यास बोन मॅरोला होणारे नुकसान कमी करण्यासाठी वापरली जातात. तसेच उलटी, जुलाब आणि संसर्ग यांसारखी लक्षणे नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळी औषधे दिली जातात.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते, अण्वस्त्र किंवा रेडिएशन आपत्कालीन परिस्थितीत ही औषधे काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतात, परंतु ती पूर्णपणे सुरक्षितता देणारे उपाय नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारी मार्गदर्शक सूचना आणि आपत्कालीन उपायांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Web Title : क्या परमाणु विकिरण से बचाने वाली दवा है? कितनी कारगर?

Web Summary : परमाणु खतरे के बीच पोटेशियम आयोडाइड की मांग बढ़ी। यह थायरॉयड में रेडियोधर्मी आयोडीन अवशोषण को रोककर आंशिक विकिरण सुरक्षा दे सकती है। विशेषज्ञ परमाणु आपात स्थिति के दौरान सरकारी दिशानिर्देशों का पालन करने पर जोर देते हैं।

Web Title : Nuclear radiation medicine: Does it protect? How effective is it?

Web Summary : Potassium iodide demand surges amid nuclear threat fears. It may offer partial radiation protection by blocking radioactive iodine absorption in thyroid. Experts emphasize following official guidelines during nuclear emergencies.