Interesting Facts : वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जाण्याची इच्छा अनेकांची असते. वेगळ्या संस्कृती, वेगळे प्रदेश, वेगळ्या भाषा, निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते. फिरण्याची आवड असणारे बरेच लोक विमानाने, कारने, जहाजाने किंवा बाइकने वेगवेगळ्या देशांची सफर करतात. पण कधी विचार केलाय का की, जर एखाद्या व्यक्तीला केवळ पायी चालून पृथ्वीचा सगळ्यात लांबचा प्रवास करायचा असेल, तर ती कुठून कुठपर्यंत जाऊ शकते? आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण पृथ्वीवर एक रस्ता आहे, जो समुद्र पार न करता, केवळ पायी चालत जाऊन पार केला जाऊ शकतो. या प्रवासाचं अंतर, वेळ आणि मार्गातील आव्हानं फारच हैराण करणारे आहेत.
पायी चालता येईल असा सगळ्यात लांब रस्ता
वैज्ञानिक आणि भूगोल तज्ज्ञानुसार, पृथ्वीवर केवळ जमिनीवर पायी चालण्याचा सगळ्यात लांब सरळ मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउनमधून सुरू होईन रशियातील मागादान शहरापर्यंत जातो. हा रस्ता जवळपास १४ हजार मैल म्हणजे २५, ५०० किलोमीटरपेक्षाही जास्त लांब आहे. खास बाब ही आहे की, या संपूर्ण प्रवासात कुठेही समुद्र पार करण्याची गरज नाही आणि आपण सरळ पायी चालत हे अंतर पार करू शकतो.
किती देशातून जातो हा रस्ता?
हा लांब पायी चालत जाण्याचा रस्ता तब्बल १६ देशांमधून जातो. आफ्रिकेतून सुरू होऊन हा प्रवास मध्य पूर्व, मध्य आशिया आणि नंतर रशियापर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या देशाच्या सीमा, संस्कृती आणि भौगोलिक परिस्थिती हा प्रवास आव्हानात्मक बनवतात. प्रत्येक देशातील वातावरण, जमिनीचा प्रकार आणि सुरक्षेची स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे हा प्रवास केवळ शरीराची नाही तर मानसिक परीक्षाही घेतो.
अंतर पार करायला किती दिवस लागतील?
जर एखादी व्यक्ती न थांबता सतत पायी चालत राहिली तर रिपोर्ट्सनुसार हा प्रवास साधारण ५९५ दिवसात पूर्ण होऊ शकतो. यासाठी आपल्याला रोज ८ तास चालावं लागेल. पण हा केवळ एक अंदाज आहे. मुळात व्यक्तीला आराम, जेवण, झोप आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागते. या सगळ्या गोष्टी सांभाळून पायी चालत राहिलात तर जवळपास ३ वर्षापर्यंत हा प्रवास सुरू राहू शकतो. म्हणजेच अंतर पार करण्याचा सगळा खेळ हा रोज किती पायी चाललं जातं यावर अवलंबून असेल.
Web Summary : The longest walkable path stretches from Cape Town, South Africa, to Magadan, Russia, covering 25,500 km across 16 countries. It would take around three years, walking daily, to complete this incredible journey.
Web Summary : सबसे लंबा पैदल मार्ग केप टाउन, दक्षिण अफ्रीका से मगादान, रूस तक फैला है, जो 16 देशों में 25,500 किमी को कवर करता है। इस अविश्वसनीय यात्रा को पूरा करने में रोजाना चलकर लगभग तीन साल लगेंगे।