भारत हा एक रहस्यमय देश म्हणूनही ओळखला जातो. पावला-पावलावर अशी माहीत समोर येते की, त्यावर विश्वास ठेवणं जरा कठीण जातं. भारताचा इतिहास अशाच काही आश्चर्यकारक माहितींनी भरलेला आहे. अशीच एक रोमांचक आख्यायिका आम्ही सांगणार आहोत. ज्या मंदिराबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तिथे ५२ टन वजनाचं लोहचुंबक लावण्यात आलं आहे.

हे मंदिर आहे कोणार्क मंदिर म्हणजेच सूर्य मंदिर. तसं तर कोणार्क मंदिर आपल्या पौराणिकतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण आणखीही काही कारणांमुळे हे मंदिर बघण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात. कोणार्क मंदिराच्या गर्भगृहातील सूर्य देवाने प्रत्यक्षात दर्शन करण्याचं भाग्य कमीच लोकांना मिळतं. 

(Image Credit : alchetron.com)

भारतातील या मंदिराचा समावेश युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. असे म्हणतात की, या विशाल मंदिरात ५२ टन वजनाचं विशाल चुंबक लावण्यात आलं होतं. पौराणिक कथांनुसार, सूर्य मंदिराच्या शिखरावर ५२ टनाचा चुंबकीय दगड लावला होता. याने समुद्रामुळे होणाऱ्या समस्या कमी व्हायच्या. ज्यामुळेच हे मंदिर शेकडो वर्षांपासून ताठ मानेने उभे आहे. तसेच या मंदिराचं मुख्य चुंबक इतर चुंबकांसोबत असं जोडलेलं होतं की, मंदिरातील मूर्ती हवेत तरंगती दिसत होती.

पण मंदिराची ही शक्तीशाली चुंबकीय व्यवस्था आधुनिक काळाच्या सुरूवातील एक समस्या होऊ लागली. चुंबकीय शक्ती इतकी प्रभावी होती की, समुद्रातील जहाजे मंदिराकडे खेचले जात होते. इंग्रजांच्या काळात याने त्यांना नुकसान होऊ लागलं होतं. त्यामुळे त्यांनी मंदिरातील चुंबक काढून टाकलं. पण याने जे झालं, त्याचा अंदाज कुणालाच नव्हता.

हे मंदिर चुंबकीय व्यवस्थेनुसार तयार करण्यात आलं होतं. विशालकाय चुंबक काढल्यानंतर मंदिराचं संतुलन बिघडलं. ज्यामुळे मंदिराच्या अनेक भिंती आणि दगडं पडू लागलेत.

ओडीशाच्या पुरी जिल्ह्यात असलेलं हे मंदिर चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर आहे. याला सूर्य मंदिर असंही म्हटलं जातं. अद्भूत कलाकृतीचा नमूना असलेलं हे मंदिर अनेक दृष्टीने वेगळं आहे. या मंदिराची कल्पना सूर्याच्या रथाप्रमाणे करण्यात आली आहे. या रथाला १२ चाके आहेत आणि त्यावर सुंदर कलाकृती आहे.


Web Title: Interesting facts and mystery about Konark temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.